प्रतिनिधी / आवळी बुद्रुक
खिंडी व्हरवडे (ता.राधानगरी) येथे कोरोनाचा सलग दुसरा रूण सापडला. त्यामुळे गावात खळबळ माजली आहे. नुकतीच सापडलेल्या 88 वर्षांच्या महिलेचा हा मुलगा असल्याचे समजून आले आहे.
या अगोदर तीन कोरोना रुग्ण सापडले होते. ते बरे होऊन येतात तोपर्यंत 17 तारखेला 88 वर्षीय महिला कोरोना पॉझिटिव्ह सापडली होती. त्यांच्या घरातील सर्वजण संपर्कात आले होते. त्यामुळे त्यांना तपासणी करण्यासाठी त्यांचा स्वॅब सीपीआरमध्ये पाठवला असता आज त्या महिलेच्या मुलाचा रिपोट पॉझिटिव्ह आला. वाढत्या रुग्ण संख्येमुळे गावात भीतीचे वातावरण पसरले आहे. त्या रुग्णाच्या संपर्कात अनेक जण आल्याच्या चर्चा सध्या गावात सुरु आहे.