प्रतिनिधी / गगनबावडा
गगनबावडा तालुक्यात रविवारी चौघांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला होता. काल आणखी तिघांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने एकच खळबळ उडाली आहे.
निवडे येथील चौघेजण गगनबावडा येथील कोरोना सेंटरमध्ये उपचार घेत आहेत. सोमवारी निवडे येथील आणखी एकजण बाधित सापडला. गगनबावडा पोलिस ठाण्यातील एकजण कोरोनाबाधित आढळला आहे. त्याच्यावर घोडावत हॉलमध्ये उपचार सुरू आहेत. तसेच येथील ग्रामीण रुग्णालयातील एक महिला कर्मचारी बाधित आढळली आहे. तिला होम क्वारंटाईन केले होते.
गगनबावडा तालुक्यात आजअखेर एकूण ४६ जण कोरोनाबाधित आढळले आहेत. तर कोरोनाने तालुक्यातील एकाचा बळी घेतला असून आज अखेर ३८ जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर आता सात जण उपचार घेत आहेत.