मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर अशोक माने यांची माहिती
जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या वतीने दुध उत्पादकांना किसान क्रेडिट कार्ड देण्यात येणार आहे. सोमवारी ग्रामविकास मंत्री तथा बँकेचे अध्यक्ष हसन मुश्रीफ यांच्या हस्ते दोन दूध संस्थांना प्रातिनिधिक स्वरूपात कर्ज वितरण करीत योजनेचा शुभारंभ करण्यात आला. या योजनेअंतर्गत म्हैशीला पाच हजार गाईला चार हजार रुपयेचे क्रेडिट कार्ड देण्यात येणार आहे अशी माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर अशोक माने यांनी दिली.
देशातील सातबारा धारक शेतकऱ्यांना पीक कर्जाचे वाटप करण्यात येते परंतु ज्या शेतकऱ्यांकडे सातबारा नाही तृप्ती शेतकरी आहे शेतमजुरी करून जनावरांचे पालन पोषण करतात ते दूध उत्पादक शेतकरी मात्र त्यांना शेतकऱ्यांप्रमाणे क्रेडिट कार्ड मिळत नाही. यासाठी केंद्र सरकारने दूध उत्पादकांसाठी किसान क्रेडिट कार्ड योजना करण्यात केली. जिल्ह्यातील राष्ट्रीयीकृत बँकांमधून ही योजना सध्या सुरू आहे.
जिल्ह्यातील बहुतांश शेतकरी हे जिल्हा बँकेची जोडलेले आहेत. सेवा सोसायटी मार्फत त्यांना पीक कर्ज दिले जाते. याच माध्यमातून आता दूध उत्पादक शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्ड देण्यात येणार आहे. जिल्ह्यातील 230000 शेतकऱ्यांना या योजनेत सहभागी करून घेण्यात येणार आहे. यासाठी सात टक्के व्याजाची आकारणी होणार आहे. शासनाकडून व्याज अनुदान प्राप्त झाल्यानंतर त्या शेतकऱ्यांना व्याजाची रक्कम परत केली जाणार आहे. जिल्ह्यातील मच्छीमार संस्था नाही साडेसात हजार रुपये किसान क्रेडिट कार्ड देणार आहे. हे कार्ड एक वर्षाच्या मुदतीसाठी असून विनातारण देण्यात येणार आहे असे डॉक्टर माने यांनी सांगितले.