आरोग्यसेवक : पहिला डोस : 38146, दुसरा डोस : 11632 : 84 टक्के
पंटलाईन वर्कर्स : पहिला डोस : 16857, दुसरा डोस : 2949 : 56 टक्के
व्याधीग्रस्त रूग्ण : पहिला डोस : 11494 : ज्येष्ठ नागरीक : 60006
प्रतिनिधी / कोल्हापूर
जिल्ह्यात कोरोना प्रतिबंधक लसीकरणाला प्रारंभ होऊन मंगळवारी 2 महिने पुर्ण झाले. आरोग्य सेवकांचे 84 टक्के तर प्रंटलाईन वर्कर्सचे 56 टक्के लसीकरण पुर्ण झाले आहे. 7 लाख 30 हजार लसीकरणाचे उद्दिष्ट आहे, दोन महिने पुर्ण होत असताना सव्वालाख जणांना प्रतिबंधक लस देण्यात आली आहे.
जिल्ह्यात 16 जानेवारीला कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचा पहिला टप्पा सुरू झाला. जिल्हÎातील 11 केंद्रांवर आरोग्यसेवक, आशा स्वयंसेविकांना लस दिली गेली. 16 मार्चला लसीकरण मोहिमेला दोन महिने पुर्ण झाले. दरम्यानच्या काळात दुसऱया टप्प्यात पंटलाईन वर्कर्स यामध्ये पोलीस, होमगार्ड, महसुल कर्मचारी, 6 मार्चपासूनच्या तिसऱया टप्प्यात 45 ते 59 वयोगटातील व्याधीग्रस्त आणि 60 वर्षावरील ज्येष्ठांना लसीकरण सुरू केले आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात 152 केंद्रांवर कोरोना लसीकरण सुरू आहेत. त्यात जीवनदायी योजनेतील 30 खासगी हॉस्पिटल्समध्ये 250 रूपयांत लस दिली जात आहे. गेल्या काही दिवसांत लसीकरणाला प्रतिसाद वाढला आहे.
जिल्ह्यात मंगळवारपर्यत 32 हजार 146 आरोग्यसेवकांना पहिला तर 11 हजार 632 जणांना दुसरा डोस दिला आहे. 38 हजार 256 चे उद्दिष्ट असून त्यापैकी 84 टक्के साध्य झाले आहे. प्रंटलाईन वर्कर्सचे 29 हजार 889 चे उद्दिष्ट आहे. त्यापैकी 16 हजार 857 जणांना पहिला तर 2049 जणांना दुसरा डोस दिला आहे, दुसऱया टप्प्यातील 56 टक्के लसीकरणाचे उद्दिष्ट साध्य झाले आहे. याशिवाय 10 दिवसांपुर्वी 45 ते 59 वयोगटातील व्याधीग्रस्त आणि 60 वर्षावरील ज्येष्ठांना तिसऱया टप्प्यात लसीकरणाला सुरूवात झाली आहे.
व्याधीग्रस्तांचे 1 लाख 52 हजार 948 लसीचे टार्गेट आहे, आजपर्यत 11 हजार 494 जणांनी लस घेतली आहे. तसेच 5 लाख 9 हजार ज्येष्ठा नागरीकांना लस देण्यात येणार आहे. आजपर्यत 60 हजार 6 जणांनी लस घेतली आहे. ज्येष्ठांच्या लसीकरणाची टक्केवारी 12 पर्यत आहे. दोन महिन्यांत 7 लाख 30 हजार 93 असे एकूण लसीकरणाचे उद्दिष्ट होते. त्यापैकी 1 लाख 20 हजार 503 जणांना लस दिली आहे. ही सरासरी टक्केवारी 17 पर्यत पोहोचली आहे. बुस्टर डोस 13 हजार 681 जणांनी घेतला असून 2 टक्के उद्दिष्ट गाठले आहे. तीनही टप्प्यांचे 100 टक्के लसीकरण पुर्ण करण्यासाठी 31 मार्चपर्यत मुदत दिली आहे. त्यामुळे कोरोना प्रतिबंधक लसीकरणाला गती आली आहे.