पॉझिटिव्ह रूग्ण 13 , कोरोनामुक्त 11, कोरोना मृत्यू 2
प्रतिनिधी/कोल्हापूर
जिल्ह्यात बुधवारी कोरोनाने सीपीआर हॉस्पिटलमध्ये शहरातील एकाचा तर खासगी रूग्णालयात ठाणे जिल्ह्यातील एकाचा मृत्यू झाला. त्यामुळे कोरोना बळींची 1 हजार 715 झाली. गेल्या 24 तासांत 13 नवे रूग्ण दिसून आले. तर 11 कोरोनामुक्त झाले. दिवसभरात 286 जणांची तपासणी केल्याची माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. विलास देशमुख यांनी दिली.
जिल्ह्यात बुधवारी कोरोनाने शहरातील शिवाजी पेठेतील 74 वर्षीय पुरूषाचा सीपीआरमध्ये मृत्यू झाला तर शास्त्रीनगर येथील खासगी रूग्णालयात ठाणे जिल्हÎातील डोंबिवली पश्चिम येथील 62 वर्षीय पुरूषाचा मृत्यू झाला. आजपर्यत केरोनाने 1 हजार 715 जणांचा मृत्यू झाला. ग्रामीण भागात 844, नगरपालिका क्षेत्रात 347, शहरात 369 तर अन्य 155 जणांचा समावेश आहे. सध्या 102 सक्रीय रूग्ण आहेत. दिवसभरात 286 जणांची तपासणी केली. त्यातील 139 जणांची अँटीजेन टेस्ट केली आहे.
शेंडा पार्क येथील लॅबमधून बुधवारी 539 जणांचे रिपोर्ट आले. त्यातील 522 निगेटिव्ह आहेत. ऍटिजेंन टेस्टचे 125 रिपोर्ट आले. त्यापैकी 122 निगेटिव्ह आहेत. ट्रुनेटचे 155 रिपोर्ट आले, त्यापैकी 145 निगेटिव्ह आहेत. गेल्या 24 तासांत आजरा 0, भुदरगड 0, चंदगड 1, गडहिंग्लज 0, गगनबावडा 0, हातकणंगले 0, कागल 0, करवीर 0, पन्हाळा 0, राधानगरी 0, शाहूवाडी 0, शिरोळ 0, नगरपालिका क्षेत्रात 4, कोल्हापूर शहर 6 व अन्य 2 असे 13 रूग्ण आहेत. दिवसभरात 11 जणांना डिसचार्ज मिळाल्याने कोरोनामुक्तांची संख्या 47 हजार 976 झाले. नव्या 13 रूग्णांमुळे पॉझिटिव्ह रूग्णसंख्या 49 हजार 793 झाली आहे, अशी माहिती डॉ. देशमुख यांनी दिली.
आजपर्यतचे कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण ः 49 हजार 793
आजपर्यतचे कोरोनामुक्त रूग्ण ः 47 हजार 976
सध्या उपचार घेत असलेले कोरोना रूग्ण ः102
आजपर्यतचे एकूण कोरोना बळी ः 1715
गेल्या 24 तासांत 286 संशयितांची तपासणी