ऑनलाईन टीम / कोल्हापूर
राज्यासह जिल्ह्यात कोरोनास्थिती दिवसें – दिवस चिंतेची बनत असून कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोनास्थिती पाहता जिल्ह्यात तिसऱ्या लाटेला सुरवात झाली असल्याचे महत्वपूर्ण विधान जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.योगेश साळे यांनी केले आहे. डिसेंबर पूर्वी कोरोना पॉझिटीव्ह रेट हा 0.4 इतका होता. तोच रेट आता 4 टक्यावर गेल्याने ही स्थिती उद्भवल्याचं डॉ. योगेश साळे यांनी स्पष्ट केले.
सध्या कोल्हापूर जिल्ह्यात 282 सक्रिय रुग्ण आहेत. यापैकी 65 लोक घरात विलगीकरण करण्यात आले असून 35 टक्के रुग्ण उपचार घेत आहेत. तसेच सौम्य लक्षण असलेल्या रुग्णांची संख्या अधिक असून 4 ते 5 रुग्णांची प्रकृती चिंताजनक आहेत. त्यामूळे प्रशासन तालुका स्तरावर कोविड सेंटर पुन्हा सुरू करत असल्याचे ही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
या पार्श्वभूमीमूळे कोल्हापूर जिल्ह्यात कोरोना रुग्ण वाढणार असल्याने नागरीकांनी मार्गदर्शक सूचनांचे तंतोतंत पालन करणे अत्यावश्यक बनले आहे. सद्या जिल्ह्यात 10 ओमोनिक्रॉन रुग्ण असून जिल्हा आरोग्य यंत्रणेच काम वाढले आहे. तसेच कोल्हापूर जिल्ह्यात लसीकरण केलेल्यांची टक्केवारी पाहता 1 डोस 93 टक्के नागरीक आहेत. तर 2 डोस घेतलेले 70 टक्के नागरीक असल्याचे ही त्यांनी यावेळी सांगितले. या बरोबर 15 ते 18 वयोगटातील दिवसाला 18 हजार युवकांचे लसीकरण केले जातं असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले .