कोरोना बळींची संख्या 5 हजारांवर
प्रतिनिधी/कोल्हापूर
जिल्ह्यात शुक्रवारी, गेल्या 24 तासात कोरोनाचे 1 हजार 640 नवे रूग्ण आढळले. कोरोनाने 29 जणांचा मृत्यू झाला. दिवसभरात 1 हजार 397 जण कोरोनामुक्त झाले. सक्रीय रूग्णसंख्या 13 हजार 780 झाली आहे. दिवसभरात शहरातील 11 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला. कोरोना मृत्यूचा आकडा स्थिर आहे.
जिल्ह्यात शुक्रवारी कोरोनाने 29 जणांचा मृत्यू झाला. आजपर्यत कोरोना बळींची संख्या 5 हजार 4 झाली आहे. यात ग्रामीण भागातील 2 हजार 692, नगरपालिका क्षेत्रात 720, शहरात 1 हजार 47 तर अन्य 545 आहेत. दिवसभरात 1 हजार 397 जण कोरोनामुक्त झाले. कोरोनामुक्तांची संख्या 1 लाख 54 हजार 266 झाली आहे. गेल्या 24 तासांत 1 हजार 640 नवे रूग्ण आढळले. यामध्ये आजरा 85, भुदरगड 34, चंदगड 11, गडहिंग्लज 27, गगनबावडा 2, हातकणंगले 194, कागल 66, करवीर 277, पन्हाळा 114, राधानगरी 112 , शाहूवाडी 12, शिरोळ 145, नगरपालिका क्षेत्रात 143, कोल्हापुरात 382 तर अन्य 36 जणांचा समावेश आहे. रूग्णसंख्या 1 लाख 73 हजार 50 झाली आहे.
शेंडा पार्क येथील आरटीपीसीआर लॅबमधून शुक्रवारी 13 हजार 942 अहवाल आले. त्यापैकी 7 हजार 522 निगेटिव्ह आहेत. यामध्ये आरटीपीसीआर टेस्टचे 4 हजार 431 अहवाल आले. त्यातील 4 हजार 159 निगेटिव्ह आहेत. ऍन्टीजेन टेस्टचे 5 हजार 255 अहवाल आले. त्यातील सर्व निगेटिव्ह आहेत. ट्रुनेट टेस्टचे 4 हजार 256 रिपोर्ट आले. त्यातील 3 हजार 367 निगेटिव्ह आहेत.
परजिल्ह्यातील दोघांचा तर शहरातील 11 जणांचा कोरोनाने मृत्यू,
परजिल्ह्यातील बेळगाव व रत्नागिरी येथील एकाचा तर कोल्हापूर शहरातील 11 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला. शहरातील कोरोना मृत्यूंमध्ये रविवार पेठ, राजारामपुरी, सदर बाजार, फुलेवाडी रिंग रोड, महाडीक कॉलनी, शिवाजी पेठ, लक्ष्मीपुरी, सायबर चौक, ब्रम्हेश्वर बाग आणि शहरातील दोघांचा समावेश आहे.
टेस्ट संख्या पॉझिटिव्ह रूग्ण
आरटीपीसीआर टेस्ट 4431 264
ऍटीजेन टेस्ट 5255 487
ट्रुनेट टेस्ट 4256 889
एकूण टेस्ट 13942 1640
वर्गवारी कोल्हापूर शहर ग्रामीण, अन्य एकूण
आजचे बाधीत रूग्ण 382 1258 1640
आजपर्यतचे बाधीत 47418 1,25,632 1,73,050
आजचे कोरोनामुक्त शहर व ग्रामीण 1397 1,54,266
दिवसभरातील मृत्यू 11 18 29
आजपर्यंतचे एकूण मृत्यू 1047 3957 5004
दिवसभरातील चाचण्या पॉझिटिव्ह निगेटीव्ह एकूण
आरटीपीसीआर 264 4159 4431
अँटीजेन 487 0000 5255
ट्रुनेट 889 3367 4256
…………………
सक्रीय रूग्ण 13,780
रूग्ण कोरोनामुक्तीचा दर टक्क्यांत 89.14 टक्के
एकूण चाचण्या ः शुक्रवार ः 13942 एकूण 12,53,362
मृतांची संख्या ः 29 जिल्हा ः 27 बाहेरील ः 2
दीर्घकालीन व्याधी 7 0
60 वर्षावरील 16 0
पहिल्या 48 तासांत मृत्यू 4 1
आजअखेर मृत संख्या 5004 जिल्हा ः 4459 अन्य ः 545
…………………
29 बळी, 1640 नवे रूग्ण, 1397 कोरोनामुक्त,
शहरात दिवसभरात 11 जणांचा मृत्यू,
कोरोना रूग्ण 1640ः एकूण ः 1,73,050
कोरोनामुक्त 1397 ः एकूण ः 1,54,266
कोरोना मृत्यू 29 ः एकूण मृत्यू ः 5004
सक्रीय रूग्ण ः 13780