कोरोनामुक्तीच्या दिशेने कोल्हापूरकरांचे पाऊल,
शाहूवाडी, गगनबावडा, चंदगड झोनमुक्त,
पन्हाळा, कागल, राधानगरी लवकरच झोनमुक्त,
कोरोना कंटेन्मेंट, बफर झोनची संख्या हजारांवरून शेकड्यांवर
कृष्णात पुरेकर / कोल्हापूर
जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढला अन् पॉझिटिव्ह, संशयित रूग्णसंख्या वाढली, कम्युनिटी स्प्रेडचा धोका वाढल्याने प्रशासनाने कंटेनमेंट, बफर झोनचे नियोजन केले. जिल्ह्यात 2382 कटेन्मेंट तर 2382 बफर झोनची निर्मिती झाली. कोरोना प्रतिबंधासाठीचे हे पाऊल उपयुक्त ठरले. ऑक्टोबरमध्ये 10 दिवसांत कोरोना रूग्ण, संशयितांची संख्या घटली आहे. रविवारी कंटेनमेंट, बफर ऍक्टिव्ह झोनची संख्या 261 पर्यत खाली आहे. शाहूवाडी तालुका झोनमुक्त झाला असून दोन दिवसांत कागल, राधानगरी आणि पन्हाळा तालुकाही कोरोना झोनमुक्त होणार आहे.
जिल्ह्यात कोरोना साथ सुरू झाली, अन् मार्चपासून सप्टेंबरपर्यत कोरोनाचा संसर्ग वाढत गेला. जूनपर्यंत कोरोना रूग्णांची संख्या 848 होती, जुलैमध्ये ती 5 हजार 462 वर पोहोचली. आगॅस्टमध्ये ती 17 हजारांनी तर सप्टेंबरमध्ये पॉझिटिव्ह रूग्णसंख्येत 21 हजारांनी वाढ झाली. जिल्ह्यातील 1 हजार 225 गावांपैकी 753 गावे कोरोनाबाधित झाली, पण 87 गावांत आजही कोरोनाचा शिरकाव झालेला नाही, ही वस्तुस्थिती आहे.
जिल्ह्यातील 655 गावांत 5 पेक्षा कोरोनाचा कमी केसेस तर पाच पेक्षा जास्त केसेसची 277 गावे आहेत. या गावांत संशयित, पॉझिटिव्ह रूग्ण सापडताच गल्ली, वॉर्ड प्रतिबंधित केली गेली. या भागात कंटेनमेंट, बफर झोन निश्चित करून 14 आणि 21 दिवसांसाठी ही क्षेत्रे प्रतिबंधित केली होती. कोरोना प्रतिबंधासाठी जिल्ह्यात 2 हजार 643 कंटेनमेंट झोन तर 2 हजार 339 बफर झोनची परिस्थितीनुसार निर्मिती केली गेली. प्रांताधिकारी, तहसीलदारांकडून यासंदर्भात पॉझिटिव्ह रूग्ण मिळताच तातडीने आदेश काढले गेले. याद्वारे कोरोनाचा सामुहिक संसर्ग, कम्युनिटी स्पेड रोखण्यात आला. तसेच प्रतिबंधित क्षेत्रात संशयित रूग्ण शोध मोहीम स्थानिक स्तरावर राबवली गेली. रूग्ण कोरोटाईनमुक्त होताच त्या त्या परिसरातील प्रतिबंधित क्षेत्रातील निर्बंध उठवले गेले. या निर्णयामुळे बाहेरील भागातून येणारी व्यक्ती प्रतिबंधित क्षेत्राबाहेर रोखली गेली, तर संसर्गजन्य भागातील व्यक्तीला अन्य भागातील वावरापासून रोखले गेले.
जिल्ह्यात आजरा 90, भुदरगड 105, चंदगड 122, गडहिंग्लज 308. गगनबावडा 9, हातकणंगले 666, कागल 76, करवीर 353, पन्हाळा 28, राधानगरी 32, शाहूवाडी 34, शिरोळ 816 असे 2 हजार 639 कंटेनमेंट झोन कोरोना काळात घोषित केले. याशिवाय आजरा 90, भुदरगड 105, चंदगड 122, गडहिंग्लज 308. गगनबावडा 9, हातकणंगले 666, कागल 76, करवीर 353, बफर झोनही घोषित केले. सात महिन्यांनंतर आता प्रतिबंधित क्षेत्रातील कंटेनमेंट, बफर झोनची संख्या हजारांवरून शेकडÎांवर आली आहे. ती रविवारी 261 पर्यत खाली आली आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात फक्त 261 ऍक्टिव्ह झोन राहिले आहेत. यामध्ये आजरा 12, भुदरगड 14, गडहिंग्लज 108, हातकणंगले 56, कागल 1, करवीर 40, पन्हाळा 1, राधानगरी 2, शिरोळ 27 यांचा समावेश आहे. गगनबावडा, चंदगड, शाहूवाडी तालुके कोरोना झोनमुक्त झाले आहेत.
जिल्ह्यातील तालुकानिहाय झोनची कमी झालेली आकडेवारी
तालुका कंटेनमेंट झोन, बफर झोन ऍक्टिव्ह झोन
आजरा 90 90 12
भुदरगड 105 105 14
चंदगड 122 122 0
गडहिंग्लज 308 308 108
गगनबावडा 9 9 0
हातकणंगले 666 668 56
कागल 76 76 1
करवीर 353 355 40
पन्हाळा 28 27 1
राधानगरी 32 30 2
शाहूवाडी 34 34 0
शिरोळ 816 789 27
एकूण 2639 2643 261