प्रतिनिधी / कोल्हापूर
कोल्हापूर जिल्ह्यात सलग दुसऱया दिवशी शुक्रवारी कोरोनाने दोघींचा मृत्यू झाला. यामध्ये एक शहरातील असून दुसरी महिला राधानगरीतील आहे. त्यामुळे कोरोना बळींची संख्या 1756 झाली. जिल्ह्यात 63 नवे रूग्ण दिसून आले तर 26 कोरोनामुक्त झाले. त्यामुळे सक्रीय रूग्णसंख्या 409 वर पोहोचली आहे.
सीपीआर हॉस्पिटलमध्ये मंगळवार पेठेतील 82 वर्षीय महिलेचा तर राधानगरी जुनी पेठ येथील 80 वर्षीय महिलेचा खासगी हॉस्पिटलमध्ये कोरोनाने मृत्यू झाला. त्यामुळे बळींची संख्या 1756 झाली आहे. यामध्ये ग्रामीण भागातील 855, नगरपालिका क्षेत्रात 349, कोल्हापूर शहरात 390 तर अन्य 162 जणांचा समावेश आहे. गेल्या 24 तासांत 26 जण कोरोनामुक्त झाले. आजपर्यत कोरोनामुक्तांची संख्या 48 हजार 961 झाली आहे.
जिल्ह्यात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 63 रूग्ण दिसून आले. यामध्ये आजरा 4, भुदरगड 1, चंदगड 2, गडहिंग्लज 2, गगनबावडा 0, हातकणंगले 4, कागल 0, करवीर 6, पन्हाळा 2, राधानगरी 2, शाहूवाडी 0, शिरोळ 1, नगरपालिका क्षेत्रात 7, कोल्हापूर शहरात 25 तर अन्य 7 जणांचा समावेश आहे. जिल्ह्यात शुक्रवारी 1 हजार 294 जणांची तपासणी केली. त्यातील 126 जणांची ऍटीजेन टेस्ट केली. कोरोना रूग्ण वाढल्याने सक्रीय रूग्णसंख्या 409 झाली आहे.
शेंडा पार्क येथील आरटीपीसीआर, सीबीएनएएटी लॅबमधून आलेल्या 1984 अहवालापैकी 1914 निगेटिव्ह आहेत. ऍन्टीजेन टेस्टचे 125 अहवाल आले. त्यातील 122 निगेटिव्ह आहेत. ट्रुनेट टेस्टचे 259 रिपोर्ट आले. त्यातील 232 निगेटिव्ह आहेत. जिह्यात एकूण पॉझिटिव्ह रूग्ण 51126 झाले आहेत. त्यापैकी 48961 कोरोनामुक्त झाले आहेत. आजअखेर 409 रुग्ण उपचार घेत आहेत, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अनील माळी यांनी दिली.
शहरात 177 तर ग्रामीणमध्ये 47 होम कोरोंटाईन
शहर आणि परिसरात 207 कोरोना रूग्णांना होम आयसोलेटेड केले आहे तर ग्रामीण भागात 66 जणांना होम कोरोंटाईन केले आहे. आरोग्य विभागाच्यावतीने सर्व्हेही सुरू केला असल्याची माहिती देण्यात आली.