प्रतिनिधी / कोल्हापूर :
जिह्यासाठी गुरूवारी कोव्हीशिल्डचे 38 हजार 500 डोस उपलब्ध झाले आहेत. यापैकी 1400 डोंस दिव्यांग, गर्भवती व परदेशी जाणाऱया विद्यार्थ्यांना देण्यात येणार असल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली
जिल्हÎाला मिळालेल्या कोव्हीशिल्ड डोसमध्ये आजरा 1400, भुदरगड 1500, चंदगड 2150, गडहिंग्लज 2700, गगनबावडा 400, हातकणंगले 7980, कागल 2210, करवीर 4430, पन्हाळा 2230, राधानगरी 2230, शाहूवाडी 1880 तर शिरोळसाठी 4020 डोसचा समावेश आहे. सीपीआरसाठी 220, सेवा रूग्णालय, कसबा बावडासाठी 400 तर कोल्हापूर महापालिकेसाठी 4600 असे 38 हजार 350 डोस आले आहेत. 45 वर्षावरील लाभार्थ्यांना दुसरा डोस प्राधान्याने देण्यासाठी तालुकानिहाय लसीचा कोटा ठरवल्याची माहिती जिल्हा लसीकरण अधिकारी डॉ. फारूक देसाई यांनी दिली.