प्रतिनिधी / टोप
हातकणंगले तालुक्यातील टोप महाडिक कॉलनी परीसरातील १० जुलै रोजी ट्रान्सपोर्ट व्यावसायिकाच्या संपर्कात आलेल्या ५५ वर्षीय डॉक्टरांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. त्यामुळे टोप ग्रामस्थांनी सुटकेचा निश्र्वास टाकला आहे.
डॉक्टर त्या कोरोना पॉझिटिव्हच्या संपर्कात आल्याने गावात भितीचे वातावरण पसरले होते. त्या डॉक्टरांच्या संपर्कात आलेल्यांना तात्काळ क्वांरटाईन करण्यात आले होते. त्यांचा हि रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने समाधान व्यक्त होत आहे.
त्याचबरोबर आज प्राप्त झालेल्या अहवालानुसार टोपमधील कोरोनाबाधित मृत महिलेच्या संपर्कात आलेल्या ४ जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने टोपकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. अन्य काहींचे रिपोर्ट येणे बाकी आहे.