प्रतिनिधी / शिरोळ
येथील श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखाना कामगार संघटनेचे जनरल सेक्रेटरी डी. जे. दबडे यांना आदर्श कुशल नेतृत्वचा राज्यस्तरीय पुरस्कार नुकताच प्रदान करण्यात आला.
इचलकरंजी येथे राष्ट्रीय गुणीजन रत्नमोती सामाजिक, कला, साहित्य संमेलन संस्थेतर्फे शिरोळ दत्त साखर कारखाना आदर्श कामगार नेते धोंडीराम दबडे यांना आदर्श कुशल नेतृत्व राज्यस्तरीय पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते दिग्दर्शक व निर्माता अरुणजी नलावडे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. मान्यवरांच्या उपस्थितीत त्यांना कोल्हापुरी फेटा, सन्मानचिन्ह, सन्मानपत्र व गौरव मेडल देऊन गौरविण्यात आले. त्याबद्दल त्यांचे अभिनंदन होत आहे