सोशल डिन्स्टसिंगच्या नियमाचा भंग केल्याबद्दल चार हजार रूपयांचा दंड : रंकाळा चौपाटीवर विनामास्क फिरणाऱ्या 94 नागरिकांनाही दणका
प्रतिनिधी / कोल्हापूर
कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी महापालिकेने जनजागृतीबरोबरच दंडात्मक कारवाईची मोहीम तीव्र केली आहे. जमावबंदीचा आदेश तोडणाऱयांबरोबरच कोरोनाचे नियमभंग करणाऱयांवर कठोर कारवाईचा बडगा उगारण्यात येत आहे. महापालिकेने भरारी पथकांचीही निर्मिती केली असून त्यांच्याकडून धडक कारवाई मोहीम राबविण्यात येत आहे. सोमवारी डी-मार्टला सोशल डिन्स्टसिंगच्या नियमाचा भंग केल्याबद्दल चार हजार रूपयांचा दंड करण्यात आला. दरम्यान, रंकाळा चौपाटीवर विनामास्क फिरणाऱ्या 94 नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली.
त्यांच्या 9 हजार 400 रूपये दंड आकारण्यात आला. फुलेवाडी नाका येथील हॉटेल कृष्णा डिलक्सवरही कारवाई करण्यात आली. सोमवारी सहाय्यक आयुक्त संदीप घार्गे, चेतन कोंडे यांनी रंकाळा चौपाटी व त्याठिकाणी असलेल्या खाऊचे स्टॉल व डी मार्ट याठिकाणी तपासणी केली.