७१ हजारांचा मुद्देमाल जप्त : स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची कामगिरी
प्रतिनिधी / इचलकरंजी
येथील दरोड्याच्या तयारीत असलेल्या टोळीला धारदार हत्यारांसह स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी अटक केली. उदय सुखदेव कांबळे (वय २४, रा. खोतवाडी), रविंद्र बाळू जाधव (वय २३, रा. मणेरे मळा, कबनुर), युसूफ उर्फ आशिक इलियास गवंडी (वय १९, रा. भोने माळ), शितल रावसाहेब जत्ती (वय २२, रा. योगायोग नगर), हसन फारुख शेख (वय २५, रा. फकीर मळा, जवाहर नगर) अशी त्यांची नावे आहेत. त्यांच्याकडून २ लोखंडी कोयते, २ लोखंडी सुरे, चटणी पूड, ६ मोबाईल, मोटारसायकल असा ७१ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पेट्रोल पंपावरील कामगारांना लुटण्याच्या तयारीत असल्याची कबुली संशयितांनी दिली आहे.
ही कामगिरी सहाय्यक पोलीस निरीक्षक विकास जाधव, खंडेराव कोळी, संभाजी भोसले, राजीव शिंदे, शहनाज कनवाडे, प्रशांत कांबळे, सूरज चव्हाण, महेश खोत, अमर शिरढोणे, संजय इंगवले, रणजित पाटील, राजू कांबळे, यशवंत कुंभार यांनी केली.