आजपासून प्रवेश निश्चितीला प्रारंभ
प्रतिनिधी / कोल्हापूर
पॉलिटेक्निकची पहिली यादी शनिवारी जाहीर झाली. पहिल्या यादीतील प्रवेश निश्चितीला आजपासून प्रारंभ होणार असून, 23 सप्टेंबरपर्यंत प्रवेश निश्चिती प्रक्रिया सुरू राहणार आहे. यादीनुसार मिळालेल्या महाविद्यालयात मूळ कागदपत्रांसह प्रवेश शुल्क भरून प्रवेश निश्चित करावयाचा आहे, असे आवाहन शासकीय तंत्रनिकेतनच्या वतीने करण्यात आले आहे.
पॉलिटेक्निकच्या पहिल्या फेरीतील प्रवेश प्रक्रिया 23 सप्टेंबरपर्यंत सुरू राहणार आहेत. 24 सप्टेंबरला दुसरी फेरी सुरू होणार असून रिक्त जागांची माहिती जाहीर करण्यात येईल. 25 ते 28 सप्टेंबर दरम्यान विद्यार्थ्यांनी ऑप्शन फॉर्म भरावयाचा आहे. 30 सप्टेंबर रोजी दुसऱया फेरीतील जागा वाटप करण्यात येतील. 1 ते 6 ऑक्टोंबर दरम्यान ज्या संस्थेत प्रवेश मिळाला आहे, तेथे प्रवेश घ्यावयाचा आहे. 1 ऑक्टोंबरपासून शैक्षणिक वर्षाची सुरूवात होणार आहे. 7 ते 13 ऑक्टोंबर दरम्यान संस्था स्तरावरील प्रवेश फेरी होणार आहे. 13 ऑक्टोंबर रोजी पॉलिटेक्निकची प्रवेश प्रक्रिया पूर्ण होणार आहे.