प्रतिनिधी / गारगोटी :
भुदरगड तालुक्यातील निळपण इथल्या विवाहित महिलेने किटकनाशक घेतल्याने तिचा मृत्यु झाला आहे. जयश्री जीवन चौगले वय-36 असे तिचे नाव असुन या घटनेची नोंद भुदरगड पोलीसात झाली आहे.
भुदरगड तालुक्यातील निळपण इथल्या जयश्री चौगले ही गारगोटी कोवीड सेंटरमध्ये काम करीत होती. 18 मे रोजी ती कोरोना पॉझिटिव्ह झाली होती. 28 मे पर्यंत तिच्यावर कोविड सेंटरमध्ये उपचार सुरु होते. कोरोना पॉझिटिव्ह असल्यामुळे ती मानसिक तणावाखाली होती. त्यामुळे 2 जुन रोजी तिने ग्रामोझोल नावाचे किटकनाशक औषध टोचुन घेतल होते. त्यामुळे तिच्यावर गारगोटी ग्रामिण रूग्णालयात उपचार करुन पुढील उपचारासाठी कोल्हापूर येथील खाजगी रूग्णालयात दाखल झाला आहे . याबाबतची वर्दी पती जीवन चौगले यांन पोलीसात दिली आहे.