प्रतिनिधी / कोल्हापूर
कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी 21 डिसेंबर 2020 रोजी प्रभाग आरक्षण सोडत काढण्यात आली होती. प्रभाग रचना आणि प्रभाग आरक्षण यावर हरकत घेण्यासाठी 23 डिसेंबरपासून 4 जानेवारीपर्यंत 15 दिवसांची मुदत देण्यात आली होती. या कालावधीत महापालिकेच्या निवडणूक कार्यालयाकडे 60 हरकती दाखल झाल्या. त्यातील 31 हरकती शेवटच्या दिवशी सोमवारी (4 जानेवारी) दाखल झाल्या. आता राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार हरकतींवर सुनावणी होणार आहे.
महापालिकेच्या निवडणूक कार्यालयाने प्रारूप प्रभाग रचना आणि प्रभाग आरक्षणावर हरकती, सूचना, आक्षेप स्वीकारण्यास 23 डिसेंबरपासून पासून सुरूवात केली होती. या काळात अधिकारी आणि कर्मचाऱयांच्या सुट्टÎाही रद्द करण्यात आल्या होत्या. ही प्रक्रिया उपायुक्त निखिल मोरे, सहाय्यक आयुक्त विनायक आंधकर, निवडणूक अधीक्षक विजय वणकुद्रे यांच्यासह सचिन पांडव, सचिन देवार्डेकर, सचिन घोरपडे, सागर जगदाळे, शिवाजी लिगाडे आदी कर्मचाऱयांनी राबविली.
15 दिवसांत 60 हरकती दाखल
सोमवारी 4 जानेवारीला शेवटच्या दिवशी तब्बल 31 हरकती दाखल झाल्या. त्याआधी 3 जानेवारीपर्यंत 14 दिवसांत 29 हरकती दाखल झाल्या होत्या. दाखल झालेल्या साठ हरकतींपैकी 30 हरकती या आरक्षण सोडतीच्या प्रक्रियेवर आक्षेप घेणाऱया आहेत. तर उर्वरीत 30 हरकती या प्रारूप प्रभाग रचनेवर आक्षेप घेणाऱया आहेत. या सर्व हरकती 6 जानेवारील राज्य निवडणूक आयोगाकडे पाठविण्यात येणार आहेत. त्यानंतर आयोगाकडून प्राप्त हरकतींवर सुनावणी होणार आहे. त्याबाबतचे निर्देश आल्यानंतर सुनावणीची प्रक्रिया जाहीर करण्यात येईल. सुनावणीसाठी आयोगाचा आयएएस दर्जाचा बडा अधिकारी येण्याची शक्यता आहे. सुनावणी 10 जानेवारी होण्याची शक्यता आहे. सध्या तरी महापालिकेच्या निवडणूक कार्यालयात राज्य निवडणूक आयोगाकडून येणाऱया पुढील निर्देशाची प्रतीक्षा आहे.