व्हेंटिलेटर, ऑक्सिजन बेडसाठी प्रतीक्षा, तीन दिवसांपासून सीपीआरमधील स्थिती
प्रतिनिधी / कोल्हापूर
जिल्ह्यात 3 दिवसांपासून कोरोना रूग्णांत वाढ झाली आहे. सक्रीय रूग्ण वाढल्याने सीपीआरमध्ये व्हेटिलेटर, ऑक्सिजन बेडसंदर्भा सतत विचारणा होत आहे. पण रूग्ण मोठÎा संख्येने उपचार घेत असल्याने व्हेटिलेटर, ऑक्सिजन बेड फुल्ल आहेत. रविवारीही सीपीआरमध्ये अशीच स्थिती राहिली.
राज्यात कोल्हापूरची कोरोना रूग्णसंख्या सर्वांधिक आहे. टेस्ट वाढल्याने नव्या रूग्णांची भर पडत आहे. त्यामुळे 9 हजारांपर्यत खाली आलेली सक्रीय रूग्णसंख्या 11 हजारांवर पोहोचली आहे. जिल्ह्यात अनेक ठिकाणी केअर सेटर आहेत. हेल्थ सेंटर आहेत. पण तेथे ऑक्सिजन, व्हेटीलेटरची संख्या कमी असल्याने रूग्ण गंभीर बनल्यास त्याला थेट सीपीआर हॉस्पिटलमध्ये पाठवले जात आहे. त्यामुळे सीपीआरवरील ताण वाढला आहे.
राजर्षीं छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सीपीआरचे व्यवस्थापन पहात आहे. सीपीआरमध्ये सद्यस्थितीत 450 ऑक्सिजन बेड उपलब्ध आहेत. येथे उपचार घेत असलेल्या क्रिटीकल रूग्णांची संख्या अधिक आहे. त्यामुळे व्हेटिलेटर, ऑक्सिजन बेड फुल्ल आहेत. डिसचार्ज होणाऱयांपेक्षा नव्याने येणाऱया रूग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे 3 दिवसांपासून व्हेटिलेटर, ऑक्सिजन बेडसाठी रूग्णांना प्रतीक्षा करावी लागत आहे. `सीपीआर’च्या वॉर रूममधून बेड उपलब्ध नसल्याचे, फुल्ल असल्याचे सांगितले जात आहे.
आलेल्या डोसइतकेच टोकन द्या ः लाभार्थ्यांची मागणी
सीपीआरमध्ये लसीकरण केंद्रात स्टाफकडून संगनमताने लस दिली जात आहे. शनिवारी लसीकरण केंद्रांत यावरून जोरदार वादावादी झाली. अगदी डॉक्टर आणि स्टाफमध्येही वाद झाला. टोकन कमी वाटले जातात, अन् अन्य डोस नंतर आलेल्या लाभार्थींना दिले जात असल्याचा आरोप लसीसाठी आलेल्या काहींनी केला. त्यामुळे जेवढे डोस आले आहेत, तेवढे टोकन द्यावेत, अशी मागणी होत आहे.