पुलाची शिरोली / वार्ताहर
महामार्ग व सेवा मार्गावर वाहने पार्किंग करुन रहदारीस अडथळा निर्माण करणार्या साठ वाहनांवर शिरोली एमआयडीसी पोलिसांनी आज कारवाई केली. शिरोली औद्योगिक वसाहत ते सांगली फाटा, आणि कोल्हापूर सांगली राज्य मार्गावरील मार्बल लाईन येथे ही कारवाई करण्यात आली. या कारवाईत सुमारे बारा हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.
याबाबत मिळालेली माहिती अशी : पुणे – बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर शिरोली औद्योगिक वसाहत ते सांगली फाटा या सुमारे अडीच किलो मीटर अंतरावर महामार्ग आणि सेवा मार्गावर असंख्य वाहने पार्किंग केलेली असतात. पार्किंग वाहनांमुळे रहदारीस अडथळा होऊन वाहतुची कोंडी होते. याबाबत अनेकदा तक्रारी झाल्या आहेत. सहायक पोलीस निरीक्षक राजेश खांडवे यांनी याचे गांभीर्य ओळखून रहदारीस अडथळा करणार्या पार्किंग वाहनांवर नियमीत कारवाई करणार असल्याचे सांगितले.