प्रतिनिधी / कोल्हापूर
सीपीआर हॉस्पिटलमध्ये कोरोना आणि म्युकर मायकोसीसवर उपचार करणाऱया कोरोना योद्ध्यांचा शिवसेनेच्यावतीने सत्कार करण्यात आला.
सीपीआर हॉस्पिटलमधील पंचगंगा हॉलमध्ये शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय पवार यांच्या हस्ते आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. एस. एस. मोरे यांच्या उपस्थितीत कोरोना योद्ध्यांचा सत्कार करण्यात आला. डॉ. सत्यवान मोरे, डॉ. अजित लोकरे, डॉ. उज्वला कोळेकर, डॉ. अभिजित ढवळे, डॉ. विदुर कर्णिक, डॉ. अपराजित वालावलकर, डॉ. मारूती पवार, डॉ. बी. एस. मोमीन, डॉ. ऋतुराज शिंदे, डॉ. टिमोथी कुगनुळकर, डॉ. गिरीश कांबळे, रमेश भोसले, बंटी सावंत आदींचा सत्कार करण्यात आला. यावेळी सुचित चव्हाण, शिवाजी जाधव, सुरेश साळोखे, विशाल देवकुळे मंजित माने, अवधुत साळोखे, धनंजय सावंत आदी उपस्थित होते.