वर्ष 2021-22 मधील आकडेवारी सादर
नवी दिल्ली
देशातील सार्वजनिक क्षेत्रात कार्यरत असणारी कोल इंडिया लि.(सीआयएल) या कंपनीने 2021-22 मध्ये 62 कोटींपेक्षा अधिकचे कोळशाचे उत्पादन घेतले आहे. यामध्ये अगोदर, मागील दोन वर्षात कंपनीच्या उत्पादनात घसरण राहिली होती. अशी माहिती कंपनीच्या एका अधिकाऱयाने दिली आहे. कंपनीने चालू आर्थिक वर्षातील 28 मार्चपर्यंत 61.44 कोटी टन उत्पादन घेतले आहे. मागील वर्षाच्या तुलनेत हे विक्रमी उत्पादन होणार असल्याची माहिती आहे. कोळशाचा पुरवठा हा 2021-22 च्या दरम्यान 66 कोटी टन आकडय़ाच्याही पुढे जाणार असल्याचे संकेत मांडले आहेत.
सरकारने चालू आर्थिक वर्षात 67 कोटी टन कोळसा उत्पादनाचे ध्येय निश्चित केले होते. खाण कंपनीने 2021 ते 22 मध्ये 64 कोटी टन कोळसा उत्पादनाचे ध्येय असल्याचे म्हटले आहे.