बेंगळूर/प्रतिनिधी
राज्यात कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढच चालली आहे. राज्यातील बेंगळूर शहरी जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. बेंगळूरमध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढत असल्यानं प्रशासन चिंतेत आहे. कोरोनाला रोखण्यासाठी प्रशासन सर्व उपाययोजना राबवित आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी बंगळूरमध्ये कडक नियमावली लागू केली आहे. आता प्रशासनाने कोरोनाला रोखण्यासाठी बेंगळूरमध्ये दिवसाला १ लाख कोरोना चाचणी घेण्याचे व प्रत्येक व्यक्तीच्या किमान २० प्राथमिक व दुय्यम संपर्कात आलेल्यांना ओळखण्याचे निर्देश देण्यात आले आहेत, असे आरोग्य व वैद्यकीय शिक्षणमंत्री डॉ. के. सुधाकर यांनी सांगितले. तसेच सरकार जिल्ह्यात डोअर टू डोअर सर्व्हे करण्याच्या विचारात आहे. तसेच कोरोना चाचणी करण्यास अधिकारी घरी आल्यास नागरिकांनी सहकार्य करते असेही ते म्हणाले.
मंत्री सुधाकर यांनी कोरोना प्रकरणांमध्ये झालेल्या वाढीच्या पार्श्वभूमीवर या उपाययोजना सुरू केल्या आहेत. “कोविड चाचणीसाठी अधिकारी घरी गेले तर नागरिकांनी सहकार्य करावे”, असे आवाहन त्यांनी केले आहे.