सांखळी मतदारसंघातील कोविड रूग्णांसाठी हेल्पलाईन सुरू : सर्व प्रकारच्या मदतीची हमी
प्रतिनिधी / डिचोली
राज्यात सध्या निर्माण झालेल्या कोविड महामारीमुळे कोविड रूग्ण असलेल्या अनेक कुटुंबांना काही वाईट अनुभवांना सामोरे जावे लागत आहे. आज सर्वत्र पसरलेला कोरोना व्हायरस हा भयानक असल्याने रूग्ण असलेल्या घरांकडे कोणीही जाण्यास घाबरत आहेत. अशावेळी लोकांना आज या परिस्थितीत आपण एकाकी पडल्याची भावना मनात निर्माण होत आहे. या कठीण परिस्थितीत विशेषतः कोविड रूग्ण असलेल्या कुटुंबांना आधार देण्यासाठी सांखळीचे माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक धर्मेश सगलानी यांनी साखळी मतदारसंघासाठी खास हेल्पलाईन तयार केली असून त्याद्वारे त्यांच्याकडून कोविड चाचणी ते कोविडमुळे मृत पावलेल्या व्यक्तीच्या अंतिमसंस्कारासाठी मदत केली जात आहे.
सांखळी मतदारसंघ हा सांखळी शहर सोडल्यास पूर्णपणे ग्रामीण भागामध्ये विखुरलेला आहे. या मतदारसंघातील गावांमध्ये राहणाऱया लोकांकडे सर्वच सोयी नसल्याने त्यांची या महामारीला तोंड देण्यात मोठी गोची होते. एखाद्या घरात जर एखाद्या व्यक्तीला कोरोनाची लक्षणे दिसून आल्यास त्याला चाचणीसाठी सांखळी सरकारी सामाजिक आरोग्य केंद्रात येणे शक्मय नसते. अशावेळी कोणी आपली गाडी देत नाही की कोणी या लोकांना इस्पितळात घेऊन येत नाही. कोविड चाचणीलाच जाण्यासाठी येणारी समस्या आणि संकटे कोविड चाचणी सकारात्मक आल्यानंतर तर अधिकच गडद होत असते आणि अशावेळी अनेकांना लोकांचा आधार मिळत नसल्याने त्यांना या कठीण आणि नाजूक परिस्थितीत जिवंतपणीच मरण यातना सहन कराव्या लागतात. लोकांच्या या यातना समजून घेतल्यानंतरच सांखळी मतदारसंघासाठी आपण विशेष हेल्पलाईन सुरू करण्याचा निर्णय घेतला, असे धर्मेश सगलानी यांनी सांगितले.
गेल्या 13 मे रोजी धर्मेश सगलानी यांनी या हेल्पलाईनची घोषणा करताना केवळ कोविड रूग्ण आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी एक खास व्हॉट्सऍप ग्रुप तयार केला आहे. त्यात केवळ कोविड रूग्ण आणि त्यांच्या कुटुंबातील ठराविक सदस्यांनाच समावून घेण्यात आले आहे. त्यामुळे या रूग्णांना कोणत्या क्षणी कशाची गरज आहे याचे संदेश मिळताच त्यांची अंमलबजावणी करता येते. तसेच लोकांच्या सेवेसाठी धर्मेश सगलानी यांनी आपला (मोबाईल क्र. 9822183775) मोबाईल क्रमांक दिला आहे.
हेल्पलाईनमध्ये कोविड चाचणी ते अंतिमसंस्कारापर्यंत मदत
या हेल्पलाईनद्वारे जेवण, किराणा सामान, घरात विलगीकरणात असलेल्या कोविड रूग्णांना होम आयझोलेशन किट घरपोच देणे, 45 वर्षांवरील लोकांना लसीकरण, कोरोना चाचणी, ऑक्सजिन सिलेंडर उपलब्ध करून देणे, ऑक्सिमीटर उपलब्ध करून देणे, रूग्णवाहिकेची सोय करणे, इस्पितळांमधील खाटांची सोय करून देणे, फोनवरून डॉक्टरांशी संभाषण करून उपचारासंबंधी सल्ले देणे, घरांचे निर्जंतुकीकरण, रूग्णांसाठी केअर टेकरची सोय, कोरोनामुळे मृत झालेल्या व्यक्तींना शववाहिका उपलब्ध करणे तसेच कोविड मृत व्यक्तीच्या अंतिमसंस्कारासाठी लाकडे व इतर सर्व ती तयारी करून देण्यास सहकार्य करणे. या सर्व गोष्टी उपलब्ध करून दिल्या जात आहेत. ही सर्व सेवा पूर्णपणे मोफत उपलब्ध करून दिली जात आहे. सकारात्मक असलेल्या कोविड रूग्णांची वेळोवेळी फोनवरून चौकशी करून खबरही घेतली जाते. त्याचप्रमाणे माफक दरात लक्षणे असलेल्या व्यक्तींची घरात जाऊन कोविड चाचणी करण्याचीही सेवा उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे सदर व्यक्ती इतरांच्या संपर्कात येत नाही आणि या व्हायरसचा फैलाव टळतो.
हेल्पलाईनद्वारे स्वयंसेवक स्वेच्छा सेवा देत आहेत
या हेल्पलाईनचा एक भाग म्हणून कोविड रूग्ण असलेल्या घरांमधील लोकांवर घराबाहेर पडण्याची पाळी येऊ नये म्हणून सांखळी शहरातील आणि मतदारसंघातील काही किराणा दुकानदारांना बरोबर घेण्यात आले आहेत. त्यांच्याकडून आवश्यकतेप्रमाणे रूग्णांच्या घरांमध्ये सामानाची डिलिव्हरी दिली जाते. त्यात रेशन किराणा मालाबरोबर फळे, भाजी, चिकन, दुध, औषधे यांचा समावेश आहे. या सेवेचा लाभ आज सांखळी मतदारसंघातील कोविड रूग्णांना बऱयाचपैकी झालेला आहे. तसेच या हेल्पलाईनच्या माध्यमातून साखळी शहर व ग्रामीण भागातील 15 ते 20 जण स्वयंसेवक बनून स्वेच्छा आणि निस्वार्थ सेवा लोकांना देत आहेत, असे धर्मेश सगलानी यांनी सांगितले.
सांखळीतील दात्यांकडून मोलाचे सहकार्य
या हेल्पलाईनची संकल्पना डोक्मयात आणून सांखळीतील काही ठराविक आणि दातृत्व भावनेने लोकांना सहकार्य करण्याचा विचार ठेवणाऱया लोकांसमोर मांडली त्यावेळी त्यांनी या संकल्पनेला उचलून धरीत आपापल्या क्षमतेनुसार मदत करण्याचे आश्वासन दिले. त्याचप्रमाणे आज या हेल्पलाईनमध्ये लोकांना हमी देण्यात आलेल्या सर्व सेवा आम्ही कोणत्याही अडथळय़ाविना देत आहोत. या हेल्पलाईनच्या सेवेमुळे आज सांखळीत रूग्णांची संख्या कमी होण्यास आणि रूग्णांना घरबसल्या योग्य ती मदत मिळविण्यास यश आले आहे. आजच्या घडीला सांखळी मतदारसंघातील सकारात्मक कोविड रूग्णांची संख्या बऱयाच अंशी घटली आहे. ती यापुढेही कमी होऊन पूर्णपणे आटोक्मयात यावी यासाठी आमचे प्रयत्न सुरूच आहेत आणि राहणार, असेही धर्मेश सगलानी यांनी सांगितले.
कोरोनाग्रस्त लोकांना आजच्या परिस्थितीत मदतीचा हात आणि धीर महत्त्वाचा. सरकारने जरी लोकांना कोविडची लक्षणे दिसताच प्राथमिक स्थरावरच चाचणी करून घेत उपचार सुरू करण्याचे आवाहन केले असले तरी सांखळी मतदारसंघातील ग्रामीण भागातील काही लोकांची परिस्थिती पाहता त्यांना आरोग्य केंद्रात पोहोचणेही शक्मय होत नाही. अशावेळी सदर व्यक्ती जर एखाद्या बसमध्ये किंवा कोणाची लिफ्ट घेऊन आल्यास हा संसंर्ग अधिक फैलावण्याची शक्मयता जास्त असते. आम्ही लोकांना घरीच राहण्याचे सल्ले देतात. पण अशा प्रकारच्या लोकांना या परिस्थितीशी संघर्ष करण्यासाठी कसली मदत देतो, हे महत्त्वाचे आहे. म्हणूनच कोविडचा संसंर्ग झालेली व्यक्ती इतरांमध्ये न मिसळता त्याची चाचणी व्हावी आणि पुढील सर्व कामे व उपचार कोणत्याही समस्येविना व्हावे. यासाठी हि हेल्पलाईन सुरू केली आहे. या भयानक परिस्थितीत आज कोविड रूग्णांबरोबरच इतरही लोकांना मदतीचा हात आणि धीर अत्यंत महत्त्वाचा आहे. म्हणूनच त्यांची वेळोवेळी खबर घेतली जाते. काही पाहिजे नको असल्यास चौकशी केली जाते. आतापर्यंत या मतदारसंघातील अनेक कोविड सकारात्मक रूग्णांनी या हेल्पलाईनच्या सेवेचा लाभ घेतला आहे आणि यापुढेही गरज असलेल्या प्रत्येक कोविड रूग्णाने किंवा कोविडची लक्षणे दिसून येणाऱया प्रत्येकाने या हेल्पलाईनसाठी संपर्क साधावा असे आवाहन धर्मेश सगलानी यांनी केले आहे.