बेंगळूर/प्रतिनिधी
कर्नाटकात कोरोना बाधितांच्या संख्येत घेत होत असली तरी राज्यातील जनतेने कोरोना बद्दल कोणत्याही प्रकारचे दुर्लक्ष करू नये असे आवाहन आरोग्य अधिकाऱ्यांनी केले आहे आणि खबरदारीचा उपाय म्हणून पूर्वीप्रमाणेच सर्व नियम पाळले पाहिजेत असेही म्हंटले आहे.
राज्यात कोरोनाचे रुग्ण कमी होत असले तरी अद्याप धोका टळलेला नाही. दरम्यान आरोग्य व वैद्यकीय शिक्षण मंत्री सुधाकर यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की मी,अंगलूरजवळील उल्लाळ येथील नर्सिंग कॉलेजमध्ये ४९ विद्यार्थ्यांमध्ये कोरोना संसर्गाची पुष्टी झाल्याच्या बातमीवरून कोविड विषाणू किती धोकादायक आणि संसर्गजन्य आहे हे दिसून येते. कोरोनाचा धोका अद्याप तहकूब केलेला नाही. कृपया आवश्यक खबरदारी घ्या. कोरोना बाबत कोणताही निष्काळजीपणा करू नका असे ते म्हणाले.असे ते म्हणाले.
दक्षिण कन्नड जिल्ह्यातील आलिया इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंगला अधिकाऱ्यांनी सील केले आहे. कॉलेजमध्ये लांबलचक सुट्टीनंतर परीक्षा देण्यासाठी आलेल्या केरळ वंशाच्या ४९ बीएससी नर्सिंग विद्यार्थ्यांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह असल्याचे दिसून आले आहे.