प्रतिनिधी / कोल्हापूर
बिग बी अमिताभ बच्चन यांनी लॉक किया जाय' म्हणत कोल्हापुरातील अवनी संस्थेला 11 लाख रूपयांची मदत केली. तर
कौन बनेगा करोडपती’ कर्मवीर कार्यक्रमात अवनी संस्थेच्या अनुराधा भोसले यांनी 25 लाख रूपये जिंकले. हा कार्यक्रम सोनी टीव्हीवर आज (दि. 20) रात्री 9 वाजता प्रसारीत होणार असून अनुराधा भोसले यांचे जीवनचरित्र उलघडणार आहे. तसेच अवनी संस्थेच्या 25 वर्षाच्या कार्याचा लेखाजोखा या कार्यक्रमातून पाहावयास मिळणार आहे.
मुंबईतील दादासाहेब फाळके फिल्मसिटीत `कौन बनेगा करोडपती’च्या सेटवर बालहक्क दिनानिमित्त अवनी संस्थेच्या अनुराधा भोसले यांच्या कार्यक्रमाचे चित्रीकरण झाले. या कार्यक्रमात बिग बी अमिताभ बच्चन यांनी अवनी संस्थेच्या कार्याचे कौतुक केले. बच्चन यांनी महात्मा गांधी, राजकारण, समाजकारण, शेती, शिक्षण आदी विषयावर विचारलेल्या प्रश्नांची भोसले यांनी अचूक उत्तरे दिली. त्यामुळे भोसले यांनी 25 लाख रूपये जिंकण्याचा बहुमान मिळवला. या कार्यक्रमाच्या माध्यमातून कोल्हापुरातील अवनी संस्था राष्ट्रीय पातळीवर पोहचली आहे. तसेच अवनीच्या अनुराधा भोसले यांच्या कार्याचा आढावा दोन तासाच्या कार्यक्रमात घेतला आहे. या कार्यक्रमाच्या चित्रीकरणा दरम्यान अनुराधा भोसले यांची मुलगी कादंबरी आणि मुलगा ग्रंथ तसेच मनाली साळुंखे यांची उपस्थिती होती.
बिग बी अवनीला भेट देणार
कार्यक्रमा दरम्यान अवनीचे सामाजिक काम पाहून बिग बी अमिताभ बच्चन भविष्यात अवनीला भेट देणार आहेत. अवनीने केलेल्या बाल कामगार, कारखाना तिथे शाळा, कचरा वेचक महिलांना न्याय, निराधार महिलांना निवारा आदी कामाचे कौतुक करीत सातत्याने मदत करण्याचे आश्वासन दिले. तसेच अवनीला दिलेली 11 लाख रूपयांची मदत अवनी संस्था बाल विवाह रोखण्यासाठी वापरणार आहे. अवनी संस्था राष्ट्रीय पातळीवर पोहचल्याने आनंद व्यक्त केला जात आहे.
अनुराधा भोसले (अवनी संस्था)