कोरोना काळात कामाचे तास कमी झाल्यामुळे किंवा वर्क फ्रॉम होमच्या सुविधेमुळे हातात बराच मोकळा वेळ राहतो. या वेळेचा सदुपयोग करण्याच्या विचारात असाल तर तुम्ही ऑनलाईन अभ्यासक्रमांना प्रवेश घेऊ शकता. आयआयएम, गूगल, क्वेसेरा यांसारख्या संस्थांनी कौशल्यविकास अभ्यासक्रम उपलब्ध करून दिले आहेत. तेही अगदी मोफत…हे अभ्यासक्रम तुमच्या नोकरी किंवा व्यवसायाच्या दृष्टीने उपयुक्त ठरू शकतील.
आयआयएमने कॉर्पोरेट फायनान्स, अकाउंटिंग अँड फायनान्स, कस्टमर रिलेशनशीप मॅनेजमेंट, पीपल मॅनेजमेंट, ऑपरेशन मॅनेजमेंट, इफेक्टिव्ह बिझनेस कम्युनिकेशन हे अभ्यासक्रम आणले आहेत. या अभ्यासक्रमांचा कालावधी पाच आठवडय़ांपासून बारा आठवडय़ांपर्यंत असतो.
गूगलने कनेक्ट वुईथ कस्टमर ओव्हर मोबाईल, इन्फ्लूअन्सिंग पीपल, इंग्लिश फॉर करिअर डेव्हलपमेंट, सोशल सायकोलॉजी, प्रमोट अ बिझनेस वुईथ कंटेंट, इंट्रोडक्शन टू सायबर सिक्योरिटी असे अत्यंत उपयुक्त अभ्यासक्रम आणले आहेत. यापैकी आवडता अभ्यासक्रम निवडून तुम्हाला भविष्या साठी सज्ज होता येईल.