प्रतिनिधी /बेळगाव
कर्नाटक अमृत स्टार्टअप 2021 योजनेंतर्गत वाघवडे बेळगावस्थित क्रिएंटर्स कंपनीची निवड करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत निवड करण्यात आलेल्या कंपनीला कर्नाटक सरकारतर्फे संशोधन व विकासासाठी अर्थसाहाय्य करून कंपनीच्या भरभराटीसाठी हातभार लावण्यात येणार आहे, अशी माहिती कंपनीच्या निर्देशिका दिशा चौगुले यांनी दिली.
या अर्थसाहाय्यामुळे आमचे उत्पादन जागतिक दर्जाचे बनविण्यास मदत होईल. कर्नाटक सरकारच्या या अर्थसाहाय्याबद्दल त्यांनी सरकारचे आभार व्यक्त केले. त्यांनी पुढे सांगितले की, थोडय़ाच दिवसांपूर्वी आमच्या कंपनीला राष्ट्रीय स्तरावर निवडलेल्या अतिउत्तम 150 स्टार्टअप कंपन्यांमध्ये स्थान मिळाले होते. आता राज्यस्तरावर अग्रीम स्थान मिळाल्यामुळे सर्व कर्मचाऱयांचा आत्मविश्वास दुणावला असून आम्ही अधिकाधिक दर्जेदार उत्पादने बाजारात आणू व बेळगाव उद्यमनगरीचा नावलौकिक सतत उंचावत राहू, याची खात्री आहे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.