महसूल कमाईत 35 टक्क्यांची तेजी
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
चीप निर्मितीत कार्यरत असणारी जागतिक कंपनी क्वालकॉमने दमदार कामगिरी केली आहे. चौथ्या तिमाहीत वर्षाच्या आधारे 35 टक्क्यांच्या तेजीने महसूल कमाई केल्याची नोंद आहे. सदरच्या तेजीसोबत कंपनीचा नफा 6.5 अब्ज डॉलर्सच्या घरात पोहेचला असून निव्वळ नफा 1.6 अब्ज डॉलर्सवर राहिला आहे.
विविध देशांमध्ये सध्या 5 जी नेटवर्कची धामधूम सुरु असल्याचे दिसून येत आहे. याचा लाभ घेत आम्ही गुंतवणूकदारांना नफा मिळवून देत असल्याचा विश्वास सीईओ स्टीव मोलेंकॉफ यांनी व्यक्त केला आहे.