राजस्थान रॉयल्सचा फलंदाज-यष्टीरक्षक जोस बटलरने युएईमध्ये पोहोचल्यानंतर आपला क्वारन्टाईन कालावधी पूर्ण केला असून आज किंग्स इलेव्हन पंजाबविरुद्ध आयपीएल साखळी सामन्यात तो खेळण्याची शक्यता आहे. बटलर यापूर्वी चेन्नई सुपरकिंग्सविरुद्ध आपल्या संघाच्या सलामी लढतीत खेळू शकला नव्हता. युएईमध्ये कुटुंबियांसह दाखल झाल्यानंतर तो क्वारन्टाईन झाला होता. ‘इंग्लंडमधून युएईमध्ये आलेल्या खेळाडूंमध्ये बटलरचा बायो-बबलमध्ये समावेश नव्हता. त्यामुळे, त्याला येथे आल्यानंतर 6 दिवस क्वारन्टाईन व्हावे लागले’, असे राजस्थान रॉयल्सच्या पदाधिकाऱयानी येथे नमूद केले. राजस्थान रॉयल्सने आपल्या सलामीच्या लढतीत चेन्नई सुपरकिंग्सला 16 धावांनी पराभूत केले असून यापुढील सामन्यात तोच धडाका कायम राखण्याचा त्यांचा प्रयत्न असणार आहे. ‘आमच्या संघाने पहिल्या सामन्यात दमदार खेळ साकारला. प्रतिकूल परिस्थितीतही सहकाऱयांनी अतिशय उत्तम प्रदर्शन साकारले. फलंदाजी व गोलंदाजी या दोन्ही आघाडय़ांवर वर्चस्व गाजवल्याने विजय साकारणे सहज शक्य झाले. वर्चस्वाची हीच मालिका आम्ही यापुढेही कायम राखण्याचा प्रयत्न करु. मी स्वतः आज पहिला सामना खेळू शकेन, अशी अपेक्षा आहे. अर्थात, किंग्स इलेव्हन पंजाबचा संघ मजबूत आहे आणि त्यांना नमवण्यासाठी कोणत्याही संघाला बरेच प्रयास घ्यावे लागू शकतात. केएल राहुलची आरसीबीविरुद्ध धडाकेबाज फलंदाजी आम्ही पाहिली आहे. त्यामुळे, त्याला स्वस्तात बाद करण्यावर आमचा सर्वाधिक भर असेल’, असे त्याने नमूद केले. शारजातील मैदान छोटे असल्याने पुन्हा एकदा धावांची आतषबाजी तेथे होईल, याचा त्याने उल्लेख केला.
Previous Articleहोय! 9 बॅट घेऊन ‘तो’ आयपीएल खेळतोय!
Next Article अजय जडेजा म्हणतो… सध्याचा धोनी तरुणाईला नको आहे!
Tarun Bharat Portal
Parasharam Patil is a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in editorial news, local news entertainment, and political content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.