वार्ताहर / खंडेराजुरी
खंडेराजुरी (ता. मिरज) येथील कृषी औषध दुकान फोडून पाच लाखांची महागडी औषधे चोरट्यांनी लंपास केली आहेत. स्टँड चौकातील सदाशिव कोष्टी यांचे गुरुप्रसाद कृषी सेवा केंद्र आहे. चार महिन्यांपूर्वीच नवीन औषध दुकान चालू केल्याने त्यांनी औषध दुकानात मोठ्या प्रमाणात महागडी औषधे, खते भरले होती.
रविवारी सुट्टी असल्याने सोमवारी सकाळी दुकानात आल्यानंतर दुकानात चोरी झाल्याचे निदर्शनास आले. गावातील मुख्य बाजार पेठेत चोरी झाल्याने ग्रामस्थांमध्ये घबराट आहे.