नवी दिल्ली / वृत्तसंस्था
राखी-नारळी पौर्णिमेचा दिवस खगोलप्रेमींसाठी मोठी पर्वणी ठरणार आहे. रविवार, 22 ऑगस्टला पौर्णिमेच्या रात्री ‘ब्लू मून’ दिसणार असल्याचे अमेरिकन एस्ट्रोनॉमिकल सोसायटीने म्हटले आहे. आकाश स्वच्छ राहिल्यास भारतीय अवकाशपेमींनाही हा ब्ल्यू मून पाहण्याची संधी मिळणार आहे. सध्या पावसाळी वातावरण असल्यामुळे चंद्रदर्शन घडण्याबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे. यापूर्वी 31 ऑक्टोबर 2020 रोजी ब्लू मून दिसून आला होता. ‘ब्लू मून’ ही संकल्पना एखाद्या दुर्मिळ घटनेसाठी समजली जाते.