प्रतिनिधी/ बेळगाव
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श घेऊन भारतीय सैनिक शत्रूशी दोन हात करतात. याच शिवाजी महाराजांच्या सुवर्ण सिंहासनाच्या संरक्षणासाठी देशाच्या सीमेवर लढणारे जवान पुढे आले आहेत. काश्मीर येथे सेवा बजावणाऱया कंग्राळी खुर्द गावच्या दोन जवानांनी खडा पहारासाठी नाव नोंदणी करून आपली शिवभक्ती दाखवून दिली आहे.
स्वराज्याची राजधानी असणाऱया रायगड येथे शिवप्रति÷ानच्या माध्यमातून व भिडे गुरुजींच्या प्रेरणेतून 32 मण सुवर्ण सिंहासन उभारले जात आहे. या सुवर्ण सिंहासनाच्या संरक्षणासाठी वर्षातून 1 दिवस शिवप्रति÷ानचे धारकरी पहारा देणार आहेत. यासाठी खडा पहारा ही योजना आखण्यात आली आहे. या योजनेसाठी महाराष्ट्र तसेच देशभरात नाव नोंदणी सुरू आहे. आपणही शिवाजी महाराजांचे भक्त आहोत. त्यामुळे त्यांच्या सिंहासनाच्या संरक्षणाची जबाबदारी आपलीही आहे, या भावनेतून कंग्राळी खुर्द येथील जवान भरतेश शिवाजी पाटील व सुरज नागेंद्र पाटील या दोन जवानांनी काश्मीर येथून नाव नोंदणी केली आहे.
नाव नोंदणीचे शिवप्रति÷ानचे आवाहन
वर्षातून एक दिवस सुवर्ण सिंहासनाला पहारा देण्याची संधी धारकऱयांना मिळणार आहे. यासाठी मोठय़ा प्रमाणात नाव नोंदणीची प्रक्रिया सुरू आहे. बेळगाव विभागातून अनेक तुकडय़ा तयार व्हाव्यात, यासाठी शिवप्रति÷ान प्रयत्नशील आहे. नाव नोंदणीसाठी इच्छुक धारकऱयांनी शिवप्रति÷ानच्या गावप्रमुख, विभाग प्रमुख यांच्याकडेच नोंदणी करावी, असे आवाहन शिवप्रति÷ान बेळगावतर्फे करण्यात आले आहे.