नवी दिल्ली : देशामध्ये सध्याच्या पिक वर्षामध्ये 2020-21 साठी खरीप पिकांमध्ये तांदळाचे उत्पादन जवळपास 10.23 कोटी टन होणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. सदरची माहिती ही सरकारी आकडेवारीतून देण्यात आली आहे.
कृषी मंत्रालयाकडून सादर करण्यात आलेल्या माहितीमधून यंदाचा मान्सूनचा काळ हा समाधानकारक राहणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. यामुळे मागील वर्षात 2019-20 मधील खरीपादरम्यान तांदळाचे उत्पादन 10.19 कोटी टन झाले होते. त्यापेक्षा किंचीत जास्त उत्पादन नोंदले जाईल. प्रमुख खरीप पिकांमध्ये पहिल्या टप्प्यातील उत्पादन तेजीत राहणार असल्याची माहिती आहे.