प्रतिनिधी/ पणजी
गोवा सरकारतर्फे सादर करण्यात आलेल्या खाण प्रश्नावरील फेरविचार याचिका आज सोमवार 14 डिसेंबर रोजी सर्वोच्च न्यायालयात सुनावणीस येणार असून त्यावेळी काहीतरी सकारात्मक निकाल होण्याची अपेक्षा आहे. सदर याचिका सोमवारी होणाऱया सुनावणी यादीत समाविष्ट करण्यात आली आहे. खाणी लिजांना 2027 पर्यंत मुदतवाढ देण्याची मागणी त्यात गोवा सरकारने केली असून ती मान्य केल्यास पुढील 7 वर्षे खाणी चालू रहाण्यासाठी मदत होणार आहे. खाणीबाबत गोवा राज्याच्या बाजूने निकाल होईल अशी खात्री मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी प्रकट केली