वृत्तसंस्था /नवी दिल्ली :
ट्वीटर आता महसूल वाढविण्यासाठी प्रयत्न करणार आहे. यासाठी आगामी काळात पेड प्रोडक्टवर ट्वीटर काम करत असल्याचे एका अहवालामधून सांगण्यात आले आहे. कंपनीने या प्लॅटफॉर्मला ग्रिफॉन असे कोड नाव दिले आहे. यासाठी जॉब लिस्टिंग केले आहे. ज्यामध्ये कंपनीचे समभाग 8 टक्क्मयांनी वधारले आहेत.
सदर प्लॅटफॉर्मच्या आधारे माहिती देण्यात वाढ केली जाणार आहे आणि यासाठी ग्राहकांकडून पैसे घेण्यात येणार आहेत. याकरीता कंपनीने बुधवारी न्यूयॉर्कमधील सिनिअर सॉफ्टवेअर इंजिनिअर पदासाठी भरती सुरु केली आहे. यातून नवीन टीम उभारुन भविष्यात अन्य टीमची मदत घेत हा महसूल मिळवण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचे म्हटले आहे.
सोशल नेटवर्कीगच्या आधारे ट्वीटरही मोफत सेवा देणार आहे. परंतु सोबत महसूल प्राप्त करण्यासाठी अन्य ब्रॅण्डसला आपल्या मोठय़ा ग्राहकांच्या सोबत जाहिरात प्रदान करण्यास अनुमती देणार आहे आणि यातूनच आगामी काळात पेड सब्सक्रिप्शन, ट्वीटरची जाहिरात आणि डाटा लायसन्ससोबत महसूल मिळवण्याचे स्रोत शोधण्यास मदत होणार असल्याचे ट्वीटरने सांगितले आहे.