खानापूर : खानापूर-गांधीनगर येथील सुप्रसिद्ध खारेवाले म्हणून परिचित असलेल्या यळळूरकर परिवाराने बेळगाव-खानापूर रोडवरील केएलई कॉलेजच्या बाजूला नव्याने टाऊन कॅफे नावे स्वादीष्ट खाद्यपदार्थांच्या दुकानाचा शुभारंभ रविवारी खानापूरचे नगरसेवक नारायण मयेकर, बेळगावचे माजी नगरसेवक नेताजी जाधवसह मान्यवरांच्या उपस्थितीत थाटात केला. यावेळी उपस्थितांचे स्वागत परशराम यळळूरकर यांनी केले. खानापुरात खारेवाले म्हणून यळळूरकर परिवाराची ख्याती आहे. मुंज, बारशे, लग्नसमारंभ अथवा सामूहिक कार्यक्रमात सुग्रास व स्वादीष्ट असे गोड पदार्थ माफक दरात देतात. सुरवातीच्या काळात या बंधूंची प्रतिकूल परिस्थिती होती. पण जिद्दीने व कटाक्षाने आपल्या या व्यवसायात त्यांनी चांगलाच जेम बसवला. त्यांनी आपल्या व्यवसायात लाकडांचा वापर करून चुलीवर गोड पदार्थ बनविण्याची त्यांनी परंपरा जपली असून त्यामुळेच त्यांच्या प्रत्येक गोड वस्तूला चांगली मागणी असून याचा ग्राहकांनी लाभ घ्यावा, असे विचार माजी नगरसेवक नेताजी जाधव यांनी यावेळी व्यक्त केले. व नवीन टाऊन कॅफे व्यवसायाला शुभेच्छा दिल्या. यावेळी नगरसेवक नारायण मयेकर यांनी टाऊन कॅफे या नवीन दुकानातून अलिकडच्या युवा पिढीला तसेच सज्ञान कुटुंबांना पिझ्झा बर्गर, पास्ता, सँडवीचसारख्या चविष्ठ पदार्थांची आवड आहे. त्यामुळे त्या नवीन दुकानातून स्वादीष्ट व चवदार पदार्थ खायला मिळतील. याचा लाभ घ्यावा, असे त्यांनी सांगितले. यावेळी मष्णू यळळूरकर, परशराम यळळूरकर, मोहन यळळूरकर, शुभम यळळूरकर यासह खानापूर परिसरातील अनेक ग्राहक मंडळी उपस्थित होती.
Previous Articleखानापुरातील शेतकऱयांना एकरी 20 हजार भरपाई द्या
Next Article अनगोळमध्ये दिवसाही पाडला उजेड
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.