वार्ताहर / खानापूर
खानापूर शहरासह तालुक्मयाच्या ग्रामीण भागात शुक्रवारी रंगपंचमी साजरी झाली. एकीकडे कोरोना व्हायरल संदर्भात रंगोत्सवाबाबतचे तर्कवितर्क होणारे व्हॉट्सऍपवरील संदेशांना थारा न देता युवा वर्ग रंगात न्हाऊन गेला. खानापूर शहरात स्टेशन रोडवरील लक्ष्मी मंदिर केंचापूर गल्ली, निंगापूर गल्ली, रवळनाथ मंदिर, परिसरात युवा वर्गाने डॉल्बीच्या निनादात व पाण्याच्या फवारणीसह रंगोत्सवाचा आनंद लुटला. रंगोत्सवात शेकडो युवकांनी रंगपंचमीत उत्साहाने सहभाग घेऊन शांततेत उत्सव पार पडला. पण अनेक ठिकाणी रंगपंचमी साधेपणाने साजरी झाली.
ग्रामीण भागात बऱयाच गावांमध्ये धुलीवंदन दिवशी रंगपंचमी साजरी केली जाते. अधिकाअधिक गावात प्रथेनुसार रंगपंचमी दिवशी उत्सव साजरा केला जातोय. गावात कडक वार पाळून धार्मिक विधी देखील केल्या जातात. शुक्रवारी खानापूर, जांबोटी आदी भागात रंगपंचमी साजरी झाली. परिसरातील गावांत होळीच्या पाचव्या दिवशी रंगपंचमी साजरी करण्याची प्रथा आहे. त्यानुसार शुक्रवारी अनेक तरुण खानापूर, जांबोटी प्रमुख रस्त्यावर नैसर्गिक रंग, पिचकाऱया व विविध साहित्य घेऊन आले होते. बऱयाच गावांमध्ये तरुणांनी सप्तरंगाच्या उधळणीत संगीताच्या तालावर पाण्याच्या वर्षावात ठेका धरला. रंगपंचमी दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडला नाही.
खानापूर ग्रामीण भागात शालेय मुला-मुलींनी एकत्रित येत रंगपंचमीचा आनंद लुटला. तरुणींसह महिलांची संख्याही लक्षणीय होती. काही वृद्ध महिलांनीही संगीताच्या तालावर ठेका धरला. सकाळी सातपासूनच रंगपंचमीला सुरुवात झाल्याने सर्व व्यवहार बंद होते. दुपारनंतर बाजारपेठेत गर्दी दिसून आली नाही.
ग्रामीण भागातही जल्लोष
हलकर्णी, जांबोटी, करंबळ, नागुर्डा, होनकल, मळवसह तालुक्मयात सकाळपासूनच रंगपंचमीला सुरुवात झाली. जांबोटी येथे दुपारी रंगपंचमी कण्यात आली. खानापूर येथे पहाटेपासूनच रंगोत्सवाला सुरुवात झाल्याने प्रवाशांची ये-जा कमी होती. खानापूर परिसरात रंगपंचमी जल्लोषात साजरी करण्यात आली. यंदा तरुणाईने कोरडय़ा रंगांचा अधिक वापर करून पाण्याची नासाडी टाळली. रंगपंचमीमुळे बाजारपेठ बंद होती. कोरडय़ा रंगात संपूर्ण खानापूर परिसर न्हाऊन निघाला होता. रस्त्यांरस्त्यांवर रंगच दिसून येत होता. नाचत, थिरकत तरुणाईने रंगपंचमीचा आनंद लुटला. सकाळी 8 वाजल्यापासून शहराच्या विविध भागात रंगपंचमीला सुरुवात झाली. सुसाट वाहने हाकत मित्रांना घराबाहेर काढून युवकांनी त्यांना रंग लावण्याचा आनंद लुटला. गल्लोगल्ली युवक एकत्र येऊन गल्लीच्या कोपऱयावर रंगांची उधळण करण्यात दंग झाले होते. यासह अनेक युवक गटागटाने फिरून एकमेकांवर रंगांची उधळण करीत महिलावर्ग व युवतींचाही सहभाग होता.
नृत्यावर थिरकणारी तरुणाई
हातात रंगांनी भरलेल्या पिचकाऱया आणि सप्तरंगी उधळण करत, शुक्रवारी शहरात विविध ठिकाणी रंगपंचमी साजरी करण्यात आली. या रंगपंचमीत युवक-युवती उत्साहाने सहभागी झाले होते. यावेळी मुला-मुलींनी एकमेकांवर रंग उधळून रंगपंचमीचा आनंद घेतला. तसेच ‘लिंबू मला मारीला…’ अशा गाण्यांवर तरुणाईने सप्तरंगांची उधळण करत, पाण्याच्या वर्षावात चिंब भिजत, संगीतावर थिरकणाऱया तरुणाईमध्ये एक वेगळाच चैतन्याचा रंग यावेळी दिसून आला.
प्रथेप्रमाणे नंदगड, लोंढा, बिडी, पारिश्वाड, कारलगा तसेच तालुक्याच्या अनेक गावात सकाळपासूनच रंग उधळणीला प्रारंभ झाला. त्यामध्ये युवा पिढीबरोबरच गावातील आबालवृद्धानीही सहभाग घेतला होता. यावेळी सर्व ठिकाणी रंगपंचमी शांततेने पार पडली. विशेष म्हणजे पश्चिम भागातील सर्व प्रमुख गावांमध्ये होलिकोत्सवाला विशेष महत्त्व आहे. विशेषतः कणकुंबी, चिगुळे, पारवाड, चोर्ला, बेटणे, हेम्माडगा, जामगाव, गवाळी, पास्टोली, आमगाव आदी ठिकाणी पाच दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. सर्व ठिकाणचा होलिकोत्सव पाहण्यासारखा असतो. पायात चप्पल न घालता अनवाणी राहणे, गोड नेवैद्यादी कार्यक्रमांसह विविध कार्यक्रमही केले जातात.