वार्ताहर/ हुबळी
जिल्हय़ातील 7 खासगी रुग्णालयातील डॉक्टरांनी हुबळी जिल्हा न्यायालयासमोरील इरकल इमारतीतील श्रेया रुग्णालयाच्या एका भागात ‘युनिटी हॉस्पिटी’ नावाने कोरोनावरील उपचारासाठी स्वतंत्र 65 बेडचे रुग्णालय तयार करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. तर उर्वरित रुग्णालयात कोरोनाची लक्षणे नसलेल्या रुग्णांवर उपचार केले जाणार आहेत. रविवारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जिल्हाधिकारी आणि खासगी डॉक्टरांची बैठक पार पडली.
दरम्यान, बोलताना जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी, खासगी डॉक्टरांच्या या उपक्रमांचे स्वागत करतो. तसेच या युनिटी हॉस्पिटलला लागणाऱया सर्व सुविधा पुरविण्यासाठी प्राधान्य देण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. जिल्हा आरोग्य आणि कुटुंब कल्याणाधिकारी डॉ. यशवंत यांनी नूतन रुग्णालयाच्या संबंधित प्राधिकारकडून अनुमोदन मिळविण्यासाठी घ्यावयाच्या सविस्तर माहिती दिली.
श्रेया रुग्णालयाचे डॉ. सतीश इरकल, श्रव्य रुग्णालयाचे डॉ. एस. आर. जंबगी, रामनगौडर रुग्णालयाचे डॉ. प्रकाश रामनगौडर, अमरज्योती रुग्णालयाचे डॉ. ज्योतीप्रकाश सुल्तानपुरी, अमृत नर्सिंग होमचे डॉ. अमृत महाबलशेट्टी, गलगली नर्सिंग होमचे डॉ. अमित गलगली, मंगळा रुग्णालयाचे डॉ. शशिर देवराजू अवरन्नोळगोंड यांच्या पथकाने युनिटी रुग्णालयाची स्थापना करून कोरोना बाधितांवर उपचार करण्यासाठी पुढाकार घेतला आहे..