प्रतिनिधी / खेड :
गेल्या 2 दिवसांपासून कोसळत असलेल्या धुवाँधार पर्जन्यवृष्टीमुळे तालुक्यातील नातूवाडी, शिरवली, खोपी-पिंपळवाडी, कोंडिवली, शेलारवाडी ही पाचही धरणे ओव्हर फ्लो झाली आहेत. सद्यस्थितीत या पाचही धरणांच्या सांडव्यांवरून विसर्ग सुरू आहे. नातूनगर धरणात 18.377 द.ल.घ.मी. उपलब्ध पाणीसाठा असून धरण क्षेत्रात बुधवारअखेरपर्यंत 2208 मि. मी. इतका पाऊस पडला असल्याची माहिती नातूनगर पाटबंधारे प्रकल्पाचे अभियंता गोविंद श्रीमंगले यांनी दिली.
नातूनगर धरणातील पाण्याची पातळी 88.10 मीटर तर पाणीसाठा 19.227 द.ल.घ.मी. इतका आहे. धरणात उपलब्ध पाणीसाठा 18.377 द.ल.घ.मी. झाला असून गुरूवारी दिवसभरात धरण क्षेत्रामध्ये 175 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. आतापर्यंत धरण क्षेत्रात 2208 मि. मी. इतका पाऊस पडला असून 28.512 घ.मी.से. इतका विसर्ग धरणाच्या सांडव्यावरून सुरू आहे. शिरवली धरणातील पाण्याची पातळी 39.75 मीटर झाली असून धरणात 2.979 द.ल.घ.मी. इतका उपलब्ध पाणीसाठा आहे. बुधवारी दिवसभरात 100 मि.मी. पावसाची नोंद झाली असून आतापर्यंत धरण क्षेत्रात 2239 मि. मी. इतका पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. धरणाच्या सांडव्यावरून 11.724 घ.मी.सें. इतका विसर्ग सुरू आहे. खोपी-पिंपळवाडी धरणात 17.947 द.ल.घ.मी. इतका उपलब्ध पाणीसाठा असून पाण्याची पातळी 88.10 मीटर झाली आहे. धरण क्षेत्रात 128 मि.मी. पावसाची नोंद झाली असून आतापर्यंत 2852 मि.मी. इतका पाऊस पडला आहे. धरणाच्या सांडव्यावरून 92.16 घ.मी.सें. इतका विसर्ग सुरू आहे.
कोंडिवली धरणात 2.961 द.ल.घ.मी. इतका उपलब्ध पाणीसाठा असून पाण्याची पातळी 126.30 मीटर आहे. धरण क्षेत्रात आतापर्यंत 1989 मि.मी. इतका पाऊस पडला असून धरणाच्या सांडव्यावरून 14.435 घ.मी.से. इतका विसर्ग सुरू आहे. शेलारवाडी धरणात 6.354 द.ल.घ.मी. उपलब्ध पाणीसाठा असून पाण्याची पातळी 70.20 मीटर आहे. धरण क्षेत्रात आतापर्यंत 2582 मि.मी. इतका पाऊस पडला असून धरणाच्या सांडव्यावरून 1.547 घ.मी. सें. इतका पाण्याचा विसर्ग सुरू आहे.