प्रतिनिधी-खेड
दुबईतून आलेल्या अलसुरे येथील ५० वर्षीय व्यक्ती कोरोनाने दगावल्यानंतर त्याच्या संपर्कात आलेल्या २८ जणांचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आला होता. यापाठोपाठ आणखी २५ जणांच्या स्वबचे नमूने मिरज येथे पाठवण्यात आले होते. या अहवालाची आरोग्य प्रशासनाला प्रतिक्षाच करावी लागली होती. यातील २३ जणांचे कोरोना अहवाल निगेटिक आल्याने प्रशासनाने सुटकेचा निःश्वास टाकला आहे.
तर, कळंबणी उपजिल्हा रूग्णालयात आयसोलेशनमध्ये असलेल्या ५ जणांमध्ये गुरुवारी सायंकाळच्या सुमारास आणखी दोघांची भर पडली आहे. या दोघांच्या स्वबचे नमूने आज, शुक्रवारी तपासणीसाठी मिरज येथे पाठवण्यात आले.