प्रतिनिधी/ रत्नागिरी, खेड
खेड तालुक्यातील सुसेरी नंबर 1 दिवाळेवाडीतील 9 बालकांना कोरोनाची बाधा झाल्याने खळबळ उडाली आहे. आरोग्य यंत्रणाची धावाधावच सुरू झाली आहे. ही बालके 2 ते 12 वर्ष वयोगटातील असून त्यांना शहरातील खांबतळे येथील शिवतेज आरोग्य सेवा संस्थेच्या कोविड सेंटरमध्ये दाखल करण्यात आले आहे. दरम्यान नव्याने कोरोनाचे 597 रूग्ण आढळून आले आहेत़ तर 12 जणांचा मृत्यू झाला आह़े
जिल्हा प्रशासनाकडून †िमळालेल्या माहितीनुसार, रविवारी जिह्यात 5 हजार 540 कोरोना चाचण्या घेण्यात आल्य़ा यात आरटीपीसीआर टेस्टमध्ये 298, ऍन्टीजेनमध्ये 205 तर मागील 94 असे रूग्ण आढळून आल़े यामुळे एकूण बाधितांची संख्या आता 60 हजार 642 पर्यंत पोहोचली आह़े तर 202 बरे झालेल्या रूग्णांना घरी सोडण्यात आल़े यामुळे बरे झालेल्यांची एकूण संख्या 52 हजार 833 झाली आह़े तर जिह्यामध्ये 12 मृत्यूंची नोंद करण्यात आली आह़े यामध्ये चिपळूण तालुक्यात 3, दापोली 1, लांजा 1, मंडणगड 2, रत्नागिरी 3 तर संगमेश्वर 2 अशी नोंद करण्यात आली आह़े जिह्याचा मृत्यूदर आता 2.86 पर्यंत पोहोचला आह़े एकूण मृत्यू 1 हजार 733 झाले आहेत़ तसेच जिह्यात सध्या 6 हजार 76 रूग्ण उपचारात दाखल असल्याचे जिल्हा रूग्णालयाकडून सांगण्यात आले.
लायन्स क्लब धावले बाधित बालकांच्या मदतीला
खेडमधील येथील लायन्स क्लब बाधित बालकांच्या मदतीला धावले असून आरोग्यसेवक शंकर पार्टे यांच्याहस्ते पौष्टीक आहार देण्यात आला. खेड तालुक्यात कोरोनाबाधितांच्या वाढत्या रूग्णांबरोबरच कोरोना बळींची संख्याही वेगाने वाढत आहे. गेल्या 25 दिवसात तब्बल 25 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला. तालुक्यातील कोरोना बळींची संख्या 194 वर पोहोचली आहे. दरम्यान, प्राप्त अहवालानुसार आणखी 11 कोरोनाचे नवे रूग्ण आढळले. लोटे 3, वेरळ 2, पिरलोटे, असगणी, मोहाने, कावळे गावठाण, कुळंवडी-देऊळवाडी येथील प्रत्येकी एका रूग्णांचा समावेश आहे. नव्या रूग्णांमुळे तालुक्यातील कोरोनाबाधितांची संख्या 4945 इतकी झाली आहे. सद्यस्थितीत 286 रूग्ण सक्रिय असून 4465 रूग्णांनी कोरोनावर मात केली आहे. गेल्या 25 दिवसात 759 कोरोनाचे रूग्ण आढळले आहेत. लोटे विभागात सर्वाधिक रूग्ण आढळले असून ही संख्या 599 इतकी झाली आहे.