प्रतिनिधी / खेड
जगबुडी नदी किनारी लगतच्या शासकीय जागेत तालुका फळरोपवाटिका तथा कृषी चिकित्सालयाने घनकचरा टाकण्यास अटकाव केला असून तसा फलकही लावला आहे. घनकचरा टाकल्यास कायदेशीर कारवाईचे संकेत दिल्याने भरणे ग्रामपंचायतीची कोंडी झाली असून परिसरातून दिवसाकाठी जमा होणाऱया कचऱयाची विल्हेवाट लावताना दमछाक होत आहे.
भरणे परिसराचा विस्तार दिवसेंदिवस वाढत चालला असून लोकवस्तीही वाढत चालली आहे. मात्र वाढत्या लोकवस्तीतील कचरा विल्हेवाटीसाठी भरणे ग्रामपंचायतीकडे हक्काची जागाच नाही. यापूर्वी भरणे ग्रामपंचायतीकडून जगबुडी नदीकिनारी कचरा टाकला जात होता. यामुळे नदीपात्र दूषित होत असल्याने नगरपशासनाने ही बाब गंभीरपणे घेत जगबुडी नदीकिनारी कचरा टाकण्यास मज्जाव केला होता. या पार्श्वभूमीवर भरणे ग्रामपंचायतीने तालुका कृषी रोपवाटिकेनजीक खोदलेल्या खड्ड्यात कचरा टाकून विल्हेवाट लावण्याची पकिया सुरू केली होती. सर्व्हे क. 236 ही जागा तालुका फळरोपवाटिका तथा कृषी चिकित्सालय कार्यालयाची शासकीय जागा आहे.
याच जागेत भरणे ग्रामपंचायतीकडून कचऱ्याची विल्हेवाट लावली जात होती. सुका कचरा नदीकिनारी जाळून टाकण्याची पकियाही हाती घेतली होती. कृषी खात्याच्या अखत्यारितीतील व स्मशानभूमीजवळील असलेली जागा कचऱ्याच्या विल्हेवाटीसाठी देण्याची मागणी ग्रामपंचायतीने करत तसा पत्र व्यवहारही केला होता. मात्र, कृषी कार्यालयाने या ठिकाणी कचरा टाकण्यास अटकाव केल्याने भरणे ग्रामपंचायतीची कोंडी झाली आहे.
भरणेचे वाढते विस्तारीकरण अन् वाढती लोकसंख्या विचारात घेता ग्रामपंचायतीला कचऱयाच्या विल्हेवाटीसाठी आता तारेवरची कसरत करावी लागणार आहे. सद्यस्थितीत जगबुडी नदीकिनारीच कचरा टाकून विल्हेवाट लावण्याची नामुष्की ग्रामपंचायतीवर ओढवली आहे. ही पकिया महिनाभर सुरू राहील, असे देखील सांगण्यात येत आहे. मात्र यानंतर कचऱयाची विल्हेवाट नेमकी लावायची तरी कुठे, असा प्रश्न ग्रामपंचायतीला सतावणार आहे.