रत्नागिरी-मजगाव रोडवरील प्रकार
प्रतिनिधी/ रत्नागिरी
शहरात सध्या नळपाणी योजनेतून पाईपलाईन टाकण्यासाठी सर्वत्र खोदाईचे काम जोरात सुरू आहे. रविवारी शहरातील मजगाव रोडवर खोदकाम करत असताना जे.सी.बी. गॅस पाईपलाईनवर आदळल्याने गॅस लिकेज होण्यास सुरुवात झाली. तब्बल 10 मिनिटे गॅस लिकेज झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. मात्र तेथे मुख्य ठेकेदार हजर झाल्यानंतर गॅस गळती थांबवण्यात आल्यानंतर साऱयांचाच जीव भांडय़ात पडला.
शहरामध्ये सध्या नळपाणी योजनेतून पाईपलाईन टाकण्यासाठी खोदाईचे काम सुरु आहे. रत्नागिरी-मजगाव रोडवर पाईपलाईनचे खोदाईचे काम सुरु असताना खोदाई करत-करत जे.सी.बी. गॅस पाईपलाईनवर आदळल्याने गॅस लिकेज होण्यास सुरुवात झाली. तब्बल 10 मिनिटे गॅस लिकेज होत होता. यामुळे अनेकांच्या जीविताला धोका निर्माण होण्याची शक्यता होती. त्यानंतर मुख्य ठेकेदार तिथे आले आणि त्यानंतर गॅस गळती थांबवण्यात आली. यानंतर येथे उपस्थित कामगारांसह नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. मात्र या घटनेत मोठा अपघात होऊ शकत होता. यावेळी त्या ठिकाणी कोणतेही सिग्नल लावण्यात आलेले नाहीत. तसेच बॅरिकेट्स वगैरे काहीच लावलेले नाहीत. या बाबत उपस्थित नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत होता. ही घटना घडल्यानंतर फायर ब्रिगेडची देखील गाडी तिथे आली नाही. यावर रत्नागिरी नगर परिषदेने ठोस उपाययोजना केली पाहिजे, अशा प्रतिक्रिया या परिसरातील नागरिकांमधून व्यक्त होत आहेत.