प्रतिनिधी / गगनबावडा
असंडोली ( ता.गगनबावडा) येथील तरुणाला कोरोनाची बाधा झाली असून. या तरुणाचा शुक्रवारी घेतलेल्या स्वॅबचा अहवाल शनिवारी रात्री उशिरा प्राप्त झाला. त्यात तो बाधित असल्याचे स्पष्ट झाले.
हा एकवीस वर्षीय तरुण किझगिस्तान येथे शिक्षण घेत होता. परदेशातून आलेल्या या तरुणास कोल्हापुरातील के. आय. टी. कॉलेज येथे संस्थात्मक अलगीकरणात ठेवण्यात आले. होते दरम्यान काल रात्री उशिरा त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने त्याला पुढील उपचारासाठी छत्रपती प्रमिलाराजे हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे.
हा तरुण परदेशातून आल्यानंतर थेट संस्थात्मक अलगीकरणात असल्याने तालुक्यातील नागरिकांनी भयभीत होण्याची गरज नसल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. गगनबावडा तालुक्यातील सहाजण कोरोना पॉझिटिव्ह होते. गगनबावडा व कोल्हापूर येथील कोरोणा सेंटरमध्ये आवश्यक उपचार केल्यानंतर निगेटिव्ह अहवाल प्राप्त झाल्यानंतर त्यांना घरी सोडले होते .या सर्वांनी कोरोणावर मात केल्याने एक महिन्यापासून गगनबावडा तालूका कोरोणामुक्त होता. असंडोली येथील आढळलेला हा सातवा बाधित रुग्ण होय. सध्या तिघेजण गगनबावडा येथील विलगीकरण कक्षात असून त्यांचे अहवाल प्रलंबित आहेत.