प्रतिनिधी/ रत्नागिरी, गणपतीपुळे
गणपतीपुळे समुद्रात बुडणाऱया दोघा पर्यटकांना वाचवण्यात स्थानिकांना यश आल़े ही घटना शुक्रवारी दुपारी 1 च्या सुमारास घडल़ी सुलेमान खुदबुदिन पठाण (35, ऱा विक्रमनगर कोल्हापूर) व सोहेल मुसा मुल्ला (18, गुळकी ता. वडगाव, जी. कोल्हापूर) अशी वाचवण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत़
स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, सुलेमान पठाण व सोहेल मुल्ला हे नववर्षाच्या स्वागतासाठी गणपतीपुळे येथे आले होत़े शुक्रवारी सकाळी सोहेल व सुलेमान हे आपल्या कुटुंबासह गणपतीपुळे समुद्राच्या पाण्यामध्ये उतरले होत़े सुमुद्रामध्ये पोहण्याचा आनंद घेत असताना सुलेमान व सोहेल यांना पाण्याचा अंदाज न आल्याने दोघेही खोल पाण्यात ओढले गेल़े दोघेही पाण्यामध्ये बुडत असल्याचे समजताच कुटुंबातील सदस्यांनी जोरजोराने आरडाओरडा केल़ा
यावेळी समुद्रकिनारी असणारे मोरया वॉटरस्पोर्टचे तेजस हळदणकर हे आपल्या स्पीडबोटीने समुद्रात दोघांपर्यत पोहोचल़े तसेच स्थानिकांच्या मदतीने सुलेमान व सुहेल यांना सुखरूप पाण्याबाहेर काढल़े दरम्यान दोघा पर्यटकांना तातडीने प्राथमिक उपचार देण्यात आले असून प्रकृती सुस्थितीत असल्याचे सांगण्यात आले.
‘सेफ झोन’चे पर्यटकांकडून उल्लंघन
गणपतीपुळे येथे पर्यटकांच्या सुरक्षेसाठी सेफ झोन तयार करण्यात आला आह़े मात्र अतिउत्साही पर्यटक या सेफ झोनचे उल्लंघन करत असल्याचे दिसत आह़े स्थानिकांकडून या पर्यटकांना समजावण्याचा प्रयत्न करण्यात येत असला तरी उत्साहाच्या भरात हे पर्यटक अरेरावीही करत असल्याचे समोर आले आह़े त्यामुळे अशा अतिउत्साही पर्यटकांना लगाम घालण्याची मागणी होत आह़े