वेंगुर्ले / वार्ताहर:
गणेश चतुर्क्षी सण कालावधीत वेंगुर्ले तालुक्यातील विद्युत पुरवठा 24 तास अखंडपणे चालू ठेवून तालुक्यातील गणेश भक्तांना सहकार्य करावे अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे विद्युत वितरण कंपनीचे वेंगुर्ले तालुक्यातील कनिष्ठ अभियंता श्री. खटावकर यांची भेट घेऊन चर्चा करीत लेखी निवेदनाव्दारे शहर अध्यक्ष सत्त्यवान साटेलकर केली आहे.
विद्युत वितरण कंपनीचे कनिष्ठ अभियंता श्री. खटावकर यांना राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे सादर केलेल्या निवेदनांत गणेश चतुर्थी सण हा याभागातील सर्वात मोठा उत्साहात घरोघरी साजरा केला जाणारा सण आहे. या सणासाठी नोकरी व व्यवसाया निमीत्त बाहेर गावी असणारे चाकरमानी गावी येतात. गतवर्षी कोरोनाच्या संकटामुळे हा सण याभागातील नागरीकांना अर्थात गणेश भक्तांना साजरा करण्यांत आलेला नाही. पण यावर्षी शासनाने एस. टी. बस सेवा व रेल्वे सेवा सुरू करून गणे भक्तांना प्रवासाची मुभा दिलेली आहे. त्यामुळे मोठय़ा प्रमाणात चाकरमानी गणेश भक्त या सणासाठी येत आहेत. हा सण सर्वात असल्याने सण कालावधीत कोठेही विद्युत पुरवठा खंडीत होऊ नये. तसेच या कालावधीत भारनियमन केले जाऊ नये. तांत्रिक व नैसर्गिक कारणाने विद्युत पुरवठा खंडीत झाल्यास तो त्वरीत चालू होण्यासाठी वेळीच उपाय योजनेसाठी प्रत्येक भागात लाईनमनचे नियोजन करावे. जेणेकरून विद्युत पुरवठा खंडीत झाल्यानंतर कांही वेळात तो सुरू न झाल्यास गणे भक्तांत तीव्र संताप निर्माण होऊन विद्युत वितरण कंपनीचे नुकसान होण्याची नामुश्की आपल्या कंपनीवर येऊ नये. यादृष्टीने आपण नियोजन करावे.
या भागातील हा सर्वात मोठा व उत्साहाचा सण असल्याने आपण गणेश चतुर्थी काळात 24 तास पुरवठा सुरू ठेवून भाविकांच्या भावनांचा आदर करावा.असे लेखी निवेदनांत नमुद केले आहे.
सदरचे लेखी निवेदन तालुक्यायाचे कनिष्ठ अभियंता श्री. खटावकर यांना सादर करतेवेळी शहर अध्यक्ष सत्यवान साटेलकर यांचे समवेत जिल्हा सदस्य नितीन कुबल, डॉक्टर सेवादलचे जिल्हाध्यक्ष डॉ. संजीव लिंगवत, शहर उपाध्यक्ष वामन कांबळे, शहर सचिव स्वप्नील रावळ, सुहास जाधव हे उपस्थित होते.