एखाद्या भयावह स्वप्नाप्रमाणे वाटावे असे 2020 वर्ष संपता संपता मराठी सिनेसफष्टी आणि रसिकांसाठी एक गोड बातमी घेऊन आले आहे. कोरोना आणि लाकडाऊनच्या वातावरणामुळे आलेली मरगळ झटकून नव्या जोमाने आणि उमेदीने पुन्हा गगनभरारी घेत मराठीची पताका सातासमुद्रापार फडकवण्यासाठी मराठी सिनेसफष्टी सज्ज झाली आहे. मराठी सिनेसफष्टीत जणू नवचौतन्य आणि उत्साह संचारल्याचे चित्र सध्या पहायला मिळत आहे. नवीन वर्षाची सुरुवात काहीशा नव्या शैलीत व्हावी या उद्देशाने दुबईमध्ये गल्फ सिने फेस्ट 2021 चे आयोजन करण्यात आले आहे. नुकताच या सोहळ्याच्या लोगोचे अनावरण करण्यात आले आहे.
20 ते 23 जानेवारी 2021 या दरम्यान दुबईमध्ये गल्फ सिने फेस्ट 2021 चे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्यामध्ये मराठी सिनेसफष्टीतील अनेक तारे तारका सहभागी होणार आहेत. देश विदेशातील मान्यवर पाहुणे या सोहळ्याला हजेरी लावणार आहेत. मनोरंजनाची मेजवानी असलेल्या या बहुचर्चित आणि अनोख्या सिनेसोहळ्याचा लोगो ज्येष्ठ अभिनेते, दिग्दर्शक, निर्माते महेश कोठारे यांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आला आहे. याप्रसंगी सोहळ्याचे आयोजक सचिन कटारनवरे हेही उपस्थित होते. यावेळी कोठारे यांनी दुबईत साजर्या होणार्या या सिनेमहोत्सवाबाबत उत्सुकता आणि आनंद व्यक्त केला. या फेस्टच्या आयोजनाबाबतची माहिती त्यांनी सचिन कटारनवरे यांच्याकडून जाणून घेतली. श्गल्फ सिने फेस्ट 2021श् हे मराठी सिनेसफष्टीसाठी सकारात्मक पाऊल असून, 2021 वर्ष मराठी सिनेमांसाठी उत्साहवर्धक ठरेल, अशी आशा कोठारे यांनी व्यक्त करत गल्फ सिने फेस्ट 2021च्या संपूर्ण टीमला शुभेच्छा दिल्या.
5 जी इंटरनॅशनलच्या वतीने आयोजित गल्फ सिने फेस्ट 2021चे वैशिष्टय़ म्हणजे रसिक ज्यांची आतुरतेने वाट पहात आहेत अशा निवडक आगामी मराठी सिनेमांचे प्रीमियर शो इथे संपन्न होणार आहेत. याखेरीज काही मराठी सिनेमांच्या ट्रेलर्स, प्रोमोज आणि गाण्यांची झलकही सिनेचाहत्यांच्या आकर्षणाचे पेंद्र ठरणार आहे.