वाहनाचे तीन लाखांचे नुकसान : सुदैवाने चालक बचावला
वार्ताहर/ तवंदी
गवाण फाटय़ानजीक कांदा भरुन जाणारा ट्रक उलटला. यात ट्रकचे सुमारे तीन लाखांचे नुकसान झाले आहे. तर ट्रकचालक सुदैवाने बचावला आहे. ही घटना शनिवारी पहाटे 5 वाजता घडली.
याबाबत घटनास्थळावरुन समजलेली माहिती अशी की, ट्रक क्र. (एमएच 12 आरएन 9535) हा कांदा भरुन पुण्याहून हासनकडे चालला होता. गवाण फाटय़ानजीक आल्यानंतर या ट्रकच्या बाजूने जाणारी छोटी टेम्पो व त्यातच कंटेनर आडवा आल्याने ट्रक चालक गणेश काशिनाथ शिर्के (वय 40 रा. विटा जि. सांगली) याचा गाडीवरील ताबा सुटला व ट्रक सेवा रस्त्याच्यामध्ये असलेल्या झाडास जोराची धडक देत उलटला. या अपघातात ट्रकचे सुमारे तीन लाख रुपयाचे नुकसान झाले आहे. या अपघाताची माहिती मिळताच पायोलाईन कंपनीचे अधिकारी व निपाणी शहर पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. उपनिरीक्षक कुमार हडकर अधिक तपास करीत आहेत.