20 किलो गांजा, कार, मोटार सायकल जप्त, जिल्हा सीईएन विभागाची कारवाई
प्रतिनिधी / बेळगाव
अथणी तालुक्यातील अनंतपूर जवळ जिल्हा सीईएन विभागाच्या अधिकाऱयांनी 20 किलो गांजा जप्त केला आहे. शुक्रवारी ही कारवाई करण्यात आली असून जत, मोहोळ व पंढरपूर येथील तिघा जणांना अटक करण्यात आली आहे. सीईएन विभागाचे पोलीस निरीक्षक विरेश दोडमनी व त्यांच्या सहकाऱयांनी ही कारवाई केली आहे.
रावसाहेब आप्पाण्णा नंदिवाले (वय 37, रा. बिळ्ळूर, ता. जत), संगीता दत्तात्रय वागज (वय 49, रा. शेटपाळ, ता. मोहोळ, जि. सोलापूर), विलास पांडुरंग घाडगे (वय 30, रा. आडीव, ता. पंढरपूर, जि. सोलापूर) अशी अटक करण्यात आलेल्या तिघा जणांची नावे आहेत. त्यांच्या जवळून 20 किलो गांजा, एक होंडासिटी कार, एक मोटार सायकल असा साडेसहा लाखांहून अधिक किंमतीचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.
जिल्हा पोलीस प्रमुख लक्ष्मण निंबरगी यांनी शुक्रवारी रात्री एका पत्रकाव्दारे ही माहिती दिली आहे. जत तालुक्मयातील अनंतपूरजवळ रावसाहेब नंदिवाले याला अटक करण्यात आली. त्याच्या जवळ दोन किलो गांजा आढळून आला. एक मोटार सायकल एक मोबाईल संचही जप्त करण्यात आला. हा साठा आपण सोलापूर जिल्ह्य़ातील दोघा जणांकडून आणल्याची कबुली त्यांनी दिली.
पोलीस निरीक्षक विरेश दोडमनी, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अशोक बजंत्री, बी. एस. चिन्नीकुप्पी, वाय. व्ही. सप्तसागर, एस. ए. बेवनूर, एन. एल. गुडेण्णावर, एम. बी. कांबळे आदींच्या पथकाने पंढरपूर काठले. संगीता व विलास या दोघा जणांना अटक करुन त्यांच्याकडून 18 किलो गांजा, एमएच 12 डीएस 6623 क्रमांकाची होंडासिटी कार, वजन काटा जप्त केले आहेत.
सीमेवर पोलीसांची नजर
शुक्रवारी अटक करण्यात आलेल्या तिघा जणांवर अथणी पोलीस स्थानकात अंमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यांतर्गत एफआयआर दाखल करण्यात आला आहे. जत व मिरज तालुक्मयातून अथणी, चिकोडी तालुक्मयात प्रवेश करणाऱया सीमावर्ती भागात पोलिसांनी बारकाईने नजर ठेवली आहे. महाराष्ट्रातून येणारा गांजा रोखण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे.