साहित्य : अर्धी वाटी गाजर किसून, 1 वाटी ओट्स, 1 वाटी गव्हाचे पीठ, अर्धी वाटी मैदा, 3 चमचे ऍपलसॉस, 1 वाटी साखर, पाव वाटी बटर, 1 चमचा बेकिंग सोडा, अर्धा चमचा बेकिंग पावडर, 1 चमचा सुंठ, 2 चमचे बदाम पावडर, चिमुटभर मीठ
कृती : साखर मिक्सरला लावून पावडर बनवून बाऊलमध्ये काढावी. यामध्ये बटर मिक्स करावे. दुसऱया बाऊलमध्ये ओट्स, चाळून घेतलेले गव्हाचे पीठ आणि मैदा, गाजराचा किस, बेकिंग सोडा, बेकिंग पावडर, बदाम पावडर आणि मीठ मिक्स करावे. आता त्यात सुंठ आणि ऍपलसॉस मिक्स करावे. नंतर साखर-बटरचे मिश्रण सावकाश मिक्स करीत त्याचा गोळा मळावा. ओव्हन 350 डीग्रीवर प्रिहीट करावे. बेकिंग पॅनला तुपाचा अथवा तेलाचा हात लावावा. मळलेल्या गोळय़ाचे गोलाकार कुकीज बनवून बेकिंग पॅनवर थोडे अंतर ठेवून मांडावेत. आता बेकिंग ट्रे ओव्हनमध्ये 15 ते 20 मिनिटे ठेवून बेक करावेत. कुकीज हलक्या सोनेरी रंगावर आले की तयार कुकीज खाण्यास द्या.